लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त पोलिसांनी सोमवारी सकाळी बंदोबस्ताची रंगीत तालीम घेतली. अचानक मध्यभागातील रस्ते बंद केल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला. नागरिकांना मनस्ताप सोसावा लागला.

navi mumbai, hawkers, navi mumbai municipal corporation
नवी मुंबईत रस्त्यावरही फेरीवाल्यांचे बस्तान, महापालिका कारवाईबाबत उदासीन; नागरिकांना फेरीवाल्यांची दमदाटी
Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना

पंतप्रधान मोदी यांचे आगमन मंगळवारी (१ ऑगस्ट) शहरात होणार आहे. पंतप्रधान मोदी शिवाजी रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात दर्शन घेऊन लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहणार आहे. स.प. महाविद्यालायाच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात विविध विकासकामांच्या उद्घाटन सोहळ्यास मोदी उपस्थित राहणार आहे. पंतप्रधान दौऱ्यानिमित्त सोमवारी सकाळपासून शहरातील मध्यभागात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा… पुणे: महापालिकेचा सर्व्हर डाऊन; मिळकतकर भरण्यास अडचणी

मोदी यांचा ताफा ज्या मार्गाने जाणार आहे. त्या मार्गावर बंदोबस्ताची सोमवारी सकाळी अकरानंतर रंगीत तालीम घेण्यात आली. टप्याटप्याने शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, फर्ग्युसन रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला. प्रमुख रस्ते, उपरस्ते, चौकात सरकते लोखंडी कठडे (बॅरीकेटींग) उभे करण्यात आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. अचानक वाहतूक बंद केल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. शाळेत जाणारे विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय झाली.