पर्वती जलकेंद्र पंपिंग, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे, नवीन होळकर पंपिंग येथे येत्या गुरुवारी (२६ मे) विद्युत आणि स्थापत्यविषयक देखभाल दुरुस्तीची काही कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (२७ मे) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

शहरातील पाणीपुरवठा बंद राहणारा भाग
पर्वती जलकेंद्र भाग : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वतीगाव, सहकारनगर, सातारा रोड, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रोड ते एसएनडीटी, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड, डडाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिन्नरी झोन, मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वोरीनगर, साईबाबा नगर, सर्वेक्षण क्रमांक ४२ आणि ४६, कोंढवा खुर्द, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

mumbai ramabai ambedkar nagar zopu marathi news
रमाबाई आंबेडकर नगर पुर्नविकास : ‘झोपु’चे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात, पुढील आठवड्यात १६८४ रहिवाशांची प्रारूप यादी प्रसिद्ध करणार
women hostel building Nanded
नांदेडमधील महिला वसतिगृहाची वास्तू बनली भाजपचे प्रवेश केंद्र !
way of dharavi redevelopment is cleared railway land finally transferred to DRP
धारावी पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, रेल्वेची २५.५७ एकर जमीन अखेर ‘डीआरपी’कडे हस्तांतरित
‘आयसर’च्या प्रवेष परीक्षेची तारीख जाहीर; अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू

लष्कर जलकेंद्र भाग : लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रोड, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी.

चतु:शृंगी एसएनडीटी, वारजे जलकेंद्र परिसर : पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:शृंगी, गोखलेनगर, एरंडवणा, कोथरूड, डेक्कन जिमखाना परिसर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंदानगर, रामबाग कॉलनी, डावी उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलनी, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे विद्यापीठ, वारजे हायवे, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुद्धीकरण परिसर, औंध बावधन, सूस, सुतारवाडी, भूगाव रोड.

नवीन व जुने होळकर जलकेंद्र परिसर : मुळा रोड, खडकी, एमईएस, हरिगंगा सोसायटी.