पाणीटंचाईच्या काळात गणेश विसर्जनासाठी नदीत पाणी सोडू नये या मागणीसाठी पुण्यातील पर्यावरण कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल केली असून, या संदर्भात जिल्हाधिकारी, जलसंपदा विभाग, पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस आयुक्तांना नोटीस बजावण्यात आली आहे.
या संदर्भात शिवानी कुलकर्णी आणि सारंग यादवाडकर यांनी अॅड. असिम सरोदे, अॅड. मृणालिनी शिंदे, अॅड. प्रताप विटनकर यांच्या मार्फत याचिका दाखल केली आहे. सध्या पाण्याची टंचाई असताना विसर्जनासाठी नदीत पाणी सोडू नये, असे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. या संदर्भात संबंधित यंत्रणांना हरित न्यायाधिकरणाचे न्या. विकास किनगावकर व डॉ. अजय देशपांडे यांच्या आदेशावरून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी, जलसंपदा विभाग, पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस आयुक्त अशा सर्व प्रतिवादींना येत्या गुरुवारी (२४ सप्टेंबर) न्यायाधिकरणासमोर उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Sep 2015 रोजी प्रकाशित
विसर्जनासाठी पाणी न सोडण्याच्या याचिकेवर जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागाला नोटीस
पाणीटंचाईच्या काळात गणेश विसर्जनासाठी नदीत पाणी सोडू नये या मागणीसाठी पर्यावरण कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल केली.
Written by दया ठोंबरे
First published on: 23-09-2015 at 03:53 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Collector water dept notice