scorecardresearch

Premium

पुणे : ‘पीएमपी’च्या प्रवासी दिनात तक्रारींचा पाऊस

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रवासी दिनात ३७ तक्रारी नोंदविण्यात आल्या. तसेच १४ सूचना पीएमपी प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत.

complaints on PMP Pravasi Day
पुणे : ‘पीएमपी’च्या प्रवासी दिनात तक्रारींचा पाऊस (संग्रहित छायाचित्र)

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रवासी दिनात ३७ तक्रारी नोंदविण्यात आल्या. तसेच १४ सूचना पीएमपी प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. प्रवाशांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येणार असून सूचनांवर योग्य ती कार्यवाही केली जाणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बससेवेतील त्रुटी दूर करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी प्रवासी दिन उपक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून प्रत्येक आगारासाठी पालक अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. या उपक्रमानिमित्ताने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांच्या तक्रारी अधिकारी वर्गाकडून ऐकण्यात आल्या. पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह या वेळी उपस्थित होते.

samosa seller woman molested kalyan
कल्याणमध्ये समोसा विक्रेत्या महिलेचा विनयभंग
guardian minister dada bhuse expressed office Registration Stamp Department help citizens provided quality services
नोंदणी मुद्रांक विभागाद्वारे आता दर्जेदार सेवा; पालकमंत्री दादा भुसे यांना विश्वास
nashik eco friendly ganesh visarjan, nashik ganesh visarjan, nashik ganesh visarjan miravnuk, ganesh visarjan artificial lakes nashik
नाशिकमध्ये पर्यावरणस्नेही विसर्जनासाठी तयारी, कृत्रिम तलावांची व्यवस्था, पीओपी मूर्ती नदीपात्रात विसर्जित केल्यास कारवाई
rains cause destruction
विश्लेषण : नागपूरमध्ये पावसाने इतका विध्वंस कसा घडवला?

हेही वाचा – पुणे : प्रवाशांची गैरसोय टळणार, शिवाजीनगर मेट्रो स्थानकाबाबत झाला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

हेही वाचा – पुण्यातील नाल्यांची पूरपातळी वाढल्यास आता लगेच मिळणार ‘अलर्ट’, जाणून घ्या नवीन यंत्रणा

दरम्यान, शनिवारी (१५ जुलै) पहाटे पाच ते सकाळी आठ या कालावधीत सचिंद्र प्रताप सिंह यांनी प्रत्येक आगाराची पाहणी केली. बसथांब्यावर जाऊन प्रवाशांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यावर लवकरच कार्यवाही करण्यात येणार असून, ज्या प्रवाशांना त्यांच्या दैनंदिन कामामुळे किंवा वेळेअभावी आगारात येऊन तक्रार किंवा सूचना करण्यास अडचण असेल, तर त्यांना पीएमपीच्या मुख्य बस स्थानकावर, तसेच पास केंद्रांवर अर्ज देता येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Complaints on pmp pravasi day pune print news apk 13 ssb

First published on: 18-07-2023 at 12:53 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×