पुणे : आफ्रिकेतील मालावी देशातील महिलेवर पुण्यात अतिशय गुंतागुंतीची मेंदूशस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. मेंदू आणि मणक्याचे सर्जन डॉ. जयदेव पंचवाघ यांनी सह्याद्री रुग्णालयात ही ‘न्यूरोव्हॅस्क्युलर सर्जरी’ आणि ‘मायक्रो व्हॅस्क्युलर डीकम्प्रेशन’ (एमव्हीडी) यांची एकत्रित शस्त्रक्रिया केली. ही महिला उपचारानंतर बरी होऊन आता मायदेशी परतली आहे.

मालावीतील ही महिला उपचारासाठी सह्याद्री रुग्णालयात आली होती. तिला एकाच वेळेला ‘ट्रायजेमिनल’ आणि ‘ग्लॉसोफॅरिंजिअल’ न्यूराल्जियाची असह्य वेदना होती. त्याशिवाय तिच्या लहान मेंदूमध्ये रक्तवाहिन्यांचा जटिल गुंता असलेली मोठ्या आकाराची व उच्च दाबाचा रक्तप्रवाह असलेली गाठही होती. ही अत्यंत दुर्मीळ आणि गुंतागुंतीची समस्या होती.

Apple intelligence
‘Apple’चे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगतात पाऊल; काय आहे ॲपल इंटेलिजेंस? युजर्सना काय लाभ मिळणार?
ankita srivastava
‘वर्ल्ड ट्रान्स्प्लांट गेम’मध्ये भारताचा ठसा उमटविणारी अंकिता श्रीवास्तव…
Kutuhal Artificial intelligence and surgery
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शस्त्रक्रिया
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्रा  बुद्धिमापन चाचणी व अंकगणित
Leopard Attack in Coinbatore
रात्रीच्या अंधारात दोन डोळे चमकले, बिबट्यानं थेट भिंतीवर झेप घेतली अन्…, Video व्हायरल!
Trenza embolization surgery on a woman with cerebral hemorrhage
मुंबई : मेंदूमध्ये रक्तस्राव झालेल्या महिलेवर ‘ट्रेंझा एम्बोलिझेशन’ पद्धतीने शस्त्रक्रिया
microplastics in human testicles
पुरुषांच्या अंडकोषामध्ये आढळले मायक्रोप्लास्टिक्स; प्रजनन क्षमतेवर होणार परिणाम?
robbert
चिप-चरित्र: ‘एक अखेरचा प्रयत्न’..

हेही वाचा >>> सरकारी घोळ! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या कामाला ‘ब्रेक’

डॉ. जयदेव पंचवाघ व त्यांच्या पथकाने या महिलेवर यशस्वी उपचार केले. प्रथम डॉ. आनंद अलूरकर यांनी रक्तवाहिनीच्या या गुंत्यावर अँजिओग्राफीद्वारे एम्बोलायझेशन केले. नंतर डॉ. पंचवाघ यांनी आठ तासांच्या अवघड व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेने ही गाठ काढून टाकली. याचबरोबर ‘ट्रायजेमिनल’ व ‘ग्लॉसोफॅरिजिअल’ न्यूराल्जियाची शस्त्रक्रियाही त्याच वेळी केली. गंभीर आणि दुहेरी मज्जातंतू वेदनांपासून ही महिला आता पूर्णपणे मुक्त झाली आहे. ती आता मायदेशी परतली आहे.

हेही वाचा >>> पुणे: प्रवाशांसाठी खूशखबर! पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवास होणार वेगवान

याबाबत डॉ. पंचवाघ म्हणाले, की ‘ट्रायजेमिनल न्यूराल्जिया’ म्हणजे चेहरा, हिरडी, नाकपुडी किंवा कपाळामध्ये येणारी असह्य वेदना असते. याला ‘सुईसाइड डिसिज’ असेही म्हणतात. माणूस अनुभवू शकणारी सर्वांत वाईट वेदना, असे भीषण वर्णन केला जाणारा हा विकार आहे. यातच या महिलेला ‘ग्लोसोफॅरिंजियल न्यूराल्जिया’ म्हणजे घसा, जीभ, कानामध्ये येणाऱ्या असह्य वेदना हा आणखी एक गंभीर विकार होता. अशा प्रकारे, दुहेरी मज्जातंतू वेदनेने ग्रस्त असलेल्या या महिलेवर यशस्वीपणे उपचार करण्यात आले आहेत.

‘ट्रायजेमिनल न्यूराल्जिया’ हा विकार असलेल्या रुग्णांना अनेकदा याबाबत माहिती नसते. डॉक्टरांकडून त्यांच्यावर वेगळेच उपचार केले जातात. मेंदू शस्त्रक्रियेद्वारे असे रुग्ण बरे होऊन त्यांचे आयुष्य व्यवस्थितपणे जगू शकतात. –डॉ. जयदेव पंचवाघ, सर्जन