एका सॉफ्टवेअर कंपनीत  सोबत काम करणाऱ्या तरुणीस संगणक अभियंत्याने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या आरोपावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका २५ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यावरून रोहित सुरेशचंद्र यादव (वय २८, रा. पिंपरी इंदिरानगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी व आरोपी हे एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला आहेत. यादव हा या तरुणीपेक्षा वरिष्ठ पदावर असून त्यातून त्यांची ओळख झाली. त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याच बरोबर विविध कारणांसाठी तरुणीकडून एक लाख २५ हजार रुपये घेतले. गावी जाऊन दुसऱ्या तरुणीशी लग्न केल्याचे समजल्यावर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक हे अधिक तपास करत आहेत.