मागील आठवड्यात दिल्ली येथून पुण्याकडे विमानातून येताना. एका चिनी व्यक्तीला उलट्या झाल्याने, त्याला नायडू रुग्णालयात करोना संशयित म्हणून दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याच्यावर सहा दिवस उपचार केल्यानंतर, काल डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी रुग्णालयातील अभिप्राय नोंदवहीत तेथील उपचार पद्धतीने भारावलो असल्याचा अभिप्राय, त्या चिनी व्यक्तिने नोंदवला आहे.

चीनमधील करोना व्हायरस या आजाराने जगभरात एक दहशत निर्माण झाली आहे. या आजारावर लस शोधण्याचे काम सुरू आहे. मात्र या दरम्यान अनेक नागरिकांचा बळी देखील जात आहे. तर या आजाराच्या संशयित किंवा ज्या व्यक्तींना हा आजार झाला आहे. त्याच्या उपचारासाठी प्रत्येक देशाने स्वतंत्र वॉर्ड तयार केले आहेत.

mumbai ramabai ambedkar nagar zopu marathi news
रमाबाई आंबेडकर नगर पुर्नविकास : ‘झोपु’चे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात, पुढील आठवड्यात १६८४ रहिवाशांची प्रारूप यादी प्रसिद्ध करणार
Sensex eight hundredth retreat due to concerns over US inflation protracted tariff cuts
अमेरिकेतील महागाई, लांबलेल्या दरकपातीच्या चिंतेने ‘सेन्सेक्स’ची आठ शतकी माघार
navi mumbai, Water Supply Worker, neglect, Leads to Flood Like Situation, main valve broke, water entered the chalwl, water supply workers slept, water waste, kopar khairane news, navi mumbai news, water news, marathi news, water leakage in kopar khairane,
नवी मुंबई : निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, कर्मचाऱ्यांची झोप नडली; रहिवाशांनी रात्र जागून काढली
Love Jihad
व्हायरल होत असलेला लव्ह जिहादचा तो व्हिडीओ…

मागील आठवड्यात दिल्ली येथून पुण्याकडे १७७ प्रवाशांना घेऊन येणार्‍या विमानात एका चिनी प्रवाशाला अवस्थ वाटू लागले आणि त्याच दरम्यान त्याला उलटया देखील झाल्या. त्यामुळे सर्व प्रवासामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर पुण्यात विमान येताच संबधित व्यक्तीस पुण्यातील नायडू रूग्णालयात करोना रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या वॉर्डात ठेवण्यात आले. त्याच्या अनेक तपासण्या करण्यात आल्यानंतर काल त्याला रुग्णालयामधून घरी सोडण्यात आले.

त्यापूर्वी रूग्णालयातील अभिप्राय नोंद वहीत त्याने असे म्हटले आहे की, मला प्रवासा दरम्यान अचानक त्रास जाणवू लागल्याने, तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी माझ्याकडे नागरिक वेगळया भावनेने पाहत होते. त्या दरम्यान मला भाषेची अडचण देखील निर्माण झाली. पण येथील डॉक्टरांनी माझ्या सोबत या भारतीय नागरिकाप्रमाणे सेवा देण्याचे काम केले आहे. प्रत्येकवेळी औषध, जेवण चांगल्या प्रकारे देण्यात आले. तसेच या रुग्णालयात उत्तम सुविधा असल्याचे त्याने म्हटले आहे. सरकारी रुग्णालयाच्या अवस्थेवरून नेहमी सर्व सामान्य नागरिकांकडून रोष व्यक्त होत असताना. एका चिनी नागरीकाने चांगले उपचार केल्याचा अभिप्राय दिला आहे.