पिंपरी : मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्रावर आजपासून पाचदिवसीय किसान कृषी प्रदर्शन भरणार आहे. सकाळी नऊ वाजता प्रदर्शन स्थळी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या पहिल्या गटाच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.

प्रदर्शनामध्ये ४५० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नवउद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर करणार आहेत. देशभरातून एक लाखाहून अधिक शेतकरी भेट देतील, असा अंदाज आहे. आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे किसान प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, वाटिका व शेती लघु उद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आलेली आहेत.

हेही वाचा – पिंपरी : सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद असलेल्या गृहनिर्माण संस्थांचे नळजोड तोडण्याच्या कारवाईला विरोध; नागरिकांनी ‘दिला’ हा इशारा

हेही वाचा – भाताची पेंढी, गवत, उसाची चिपाडे आणि सोयाबिनच्या कचऱ्यापासून बायो सीएनजी… या ठिकाणी होणार प्रकल्प

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रत्येक दालनात विशिष्ट विभागातील ‘स्टॉल’ शेतकऱ्यांना पाहायला मिळतील. शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत केले आहे. दि. १३ ते १७ डिसेंबर दरम्यान हे प्रदर्शन आहे. पाच दिवस सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत प्रदर्शन खुले असणार आहे.