पुणे : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधव याचे वडील महादेव जाधव सोमवारी कोथरूड परिसरातून बेपत्ता झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या भागात शोधमोहीम राबविली. कोथरुड, एरंडवणे भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेण्यात आले. अखेर सोमवारी रात्री केदार जाधवचे वडील मुंढवा भागात सापडले. 

जाधव कुटुंबीयांनी या संदर्भात अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. जाधव कुटुंबीय कोथरूड भागात वास्तव्याला आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केदार जाधव याचे वडील महादेव जाधव कोथरूड भागातून सोमवारी (२७ मार्च) सकाळी साडेअकराच्या सुमारास रिक्षाने बाहेर गेले. मात्र, सायंकाळपर्यंत ते परतले नाहीत. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अलंकार पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

हेही वाचा >>> क्रिकेटपटू केदार जाधवच्या वडिलांचा शोध घेण्यासाठी कोथरुड परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे सोपवण्यात आला. कोथरूड, एरंडवणे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेण्यात आले आहे, तसेच या परिसरातील रिक्षा थांबे आणि रिक्षाचालकांकडून माहिती संकलनाचे काम हाती घेण्यात आले. पोलिसांनी युद्धपातळीवर तपास करुन जाधव यांचा शोध घेतला. अखेर रात्री साडेआठच्या सुमारास केदारचे वडील मुंढवा भागात सापडले, असे अलंकार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने यांनी सांगितले.