पुणे : बंगालच्या उपसागरात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. या चक्रीय स्थितीच्या प्रभावामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची, तसेच येत्या चार दिवसांत चक्रीवादळाची निर्मिती होण्याची चिन्हे आहेत.दिल्लीच्या प्रादेशिक विशेष हवामानशास्त्रीय केंद्राने (आरएसएमसी) ही माहिती दिली. चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी सर्वसाधारणपणे मोसमी पावसापूर्वी आणि मोसमी पावसानंतरचा काळ पोषक मानला जातो. त्यानुसार सध्या बंगालच्या उपसागरात असलेल्या वाऱ्याच्या चक्रीय स्थितीची वाटचाल चक्रीवादळापर्यंत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी मोसमी पावसानंतर ऑक्टोबरमध्ये बंगालच्या उपसागरात सितरंग चक्रीवादळाची निर्मिती झाली होती.

आरएसएमसीने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागराच्या आग्नेय दिशेला वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचे रुपांतर पुढील चोवीस तासांत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊ शकते. तसेच ते वायव्य दिशेला सरकत १६ नोव्हेंबरच्या सुमारास तीव्रता वाढून त्याचे दाब क्षेत्रात रुपांतर होऊ शकेल. त्यामुळे येत्या चार दिवसांत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची चिन्हे असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

hot temperature, reptiles, snakes affected, cold temperature, enters in citizen colony, marathi news, snake news, snake in uran, uran news, uran snake news,
उरण : उन्हाच्या तडाख्याचा सरपटणाऱ्या प्राण्यांना फटका, गारव्यासाठी नागरी वस्तीत शिरकाव
mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?