ऑर्डर केलेला पिझ्झा उशिरा आल्याने पुण्यातल्या एका व्यापाऱ्याने गोळीबार केला. पिझ्झा डिलिव्हरी बॉय आणि त्याच्या मॅनेजरसह या व्यावसायिकाची बाचाबाची झाली. त्यानंतर पुण्यातल्या सोसायटीत या २८ वर्षांच्या व्यावसायिकाने गोळीबार केला. त्याच्याकडे परवाना असलेल्या पिस्तुलातून त्याने गोळीबार केला. या प्रकरणी तरुणाच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपात पोलिसांनी २८ वर्षीय व्यावसायिकाला अटक केली आहे.

काय घडली घटना?

सोमवारी रात्री उशिरा पुण्यातल्या ओझोन व्हिला रेसिडेन्शिअल सोसायटीत ही घटना घडली. ही इमारत पुण्यातल्या वाघोली भागात आहेत. चेतन वसंत पडवळ असं २८ वर्षीय व्यापाऱ्याचं नाव आहे. त्याचा स्टोन क्रशिंगचा व्यवसाय आहे. चेतनने पिझ्झा घेऊन आलेल्या बॉयवर गोळी झाडली. त्यानंतर या प्रकरणात रोहित हुळसुरे या पिझ्झा शॉपच्या मॅनेजरने त्याच्या विरोधात तक्रार नोंदवली. ज्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Pune, Father, murder son, pune latest news,
पुणे : वडिलांनी दिली मुलाला मारण्यासाठी ७५ लाखांची सुपारी
article about dutch singer emma heesters
व्यक्तिवेध : एमा हिस्टर्स
newly wedded wife calls her husband aho viral video
बायकोची ‘ती’ हाक ऐकताच लाजली ‘अहों’ची स्वारी! सासरची मंडळीही खुदकन हसली; पाहा Video
Kidnapping for not opening a bank account for stock market trading
मुंबई : शेअर बाजारातील व्यवसायासाठी बँक खाते उघडून न दिल्याने अपहरण

रात्री १०.३० च्या सुमारास चेतनने पिझ्झा मागवला होता. राहुल घोरपडे हा डिलिव्हरी बॉय चेतनच्या घरी गेला होता. ऋषिकेश अण्णा पुर्वे हा डिलिव्हरी बॉयही राहुल बरोबर गेला कारण हे दोघं एकाच बाईकने जातात. रात्री ११ नंतर यांना चेतनचं घर मिळालं आणि त्यांनी पिझ्झा डिलिव्हरी करण्यासाठी बेल वाजवली. त्यावेळी चेतन बाहेर आला आणि या दोघांना उशीर झाल्याबद्दल शिव्या देऊ लागला. तसंच पिझ्झा आणायला उशीर का झाला म्हणून हुज्जत घालू लागला. तसंच या दोघांना मारहाण केली आणि गोळीार केला.

यानंतर या दोघांनी त्यांच्या मॅनेजरला या प्रकरणी फोन केला. आणखी दोघेजण काय झालं आहे ते बघायला या ठिकाणी आले. तेव्हा चेतन पडवळने या दोघांवर हल्ला केल्याचं आलेल्या इतर दोघांना कळलं. यानंतर मॅनेजरने पोलिसात तक्रार दिली. ज्यानंतर चेतनला अटक करण्यात आली आहे.

पोलीस FIR नुसार चेतन पडवळने हवेत गोळीबार केला. या घटनेत कुणीही गोळीने जखमी झालं नाही. मात्र खुनाच्या प्रयत्नात त्याने हा गोळीबार केल्याच्या गुन्ह्याखाली पोलिसांनी त्याला अटक केली आहे. कारण त्याने जी गोळी झाडली ती कुणालाही लागण्याची शक्यता होती. खासकरुन त्याच्या घराच्या वर राहणाऱ्या लोकांनाही ही गोळी इजा करु शकत होती. त्यामुळे आम्ही त्याला अटक केली आहे असं पोलिसांनी स्पष्ट केलं. या पिस्तुलाचं चेतनकडे लायसन्स आहे असं पोलीस निरीक्षक विश्वजीत कैनगाडे यांनी सांगितलं. इंडियन एक्स्प्रेसने या विषयीचं वृत्त दिलं आहे.