पुणे सायबर पोलिसांनी सायबर गुन्हेगारी करणाऱ्या पाच जणांच्या टोळक्याला अटक केली आहे. दिवसा डिलीव्हरी बॉयचे काम करणारे हे टोळके सायबर गुन्हेगारी करण्यातही सक्रिय होते. हाँगकाँगमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीला पुण्यातील आरोपी सहकार्य करत होती. ज्यांची फसवणूक केली जातेय, त्यांचे पैसे १२० बँक खात्याद्वारे हस्तांतरीत करून ते क्रिप्टोकरन्सीमार्फत हाँगकाँग या देशातील टोळीला पाठविण्याचे काम केले जात होते. पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या टोळक्याने जवळपास चार कोटींहून अधिकची लूट केली असून क्रिप्टोकरन्सीद्वारे हे पैसे हाँगकाँगमध्ये पाठविले.

पोलिसांनी अटक केलेले सर्व आरोपी हे २० ते ३० वयोगटातील आहेत. जुनेद मुख्तार कुरेशी (वय २१, रा. टिंगरेनगर, पुणे), सलमान मन्सूर शेख (वय २२, रा. इंदिरानगर, लोहगाव रोड, पुणे), अब्दुल अजीज अन्सारी (वय २३, रा. इंदिरा नगर, लोहगाव रोड, पुणे), आकिफ अन्वर आरिफ अन्वर खान (वय २९, रा. कोंढवा खुर्द, पुणे), तौफिक गफ्फार शेख (वय २२, रा. इंदिरा नगर, लोहगाव रोड, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Rishi Sunak Trolled For Shoes
ऋषी सुनक यांनी ‘अडिडास’चे स्नीकर्स घातले नी सोशल मीडियावर गजहब झाला; मागावी लागली माफी
mumbai cyber fraud 25 crore
मुंबईतील सर्वात मोठा सायबर स्कॅम; महिलेची २५ कोटींची फसवणूक, चोरांची ट्रीक अशी होती
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
raj thackeray amit shah (
भाजपाने मनसेला नेमकी काय ऑफर दिलेली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं…”

पिंपरी : क्रिप्टोकरन्सीद्वारे फसवणुकीचे रॅकेट हाँगकाँगमधून; पैसे मोजण्याच्या मशीनसह सात लाख रुपये जप्त

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुसगाव येथील एका ४६ वर्षीय महिलेने नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर (एनसीसीआरपी) फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली होती. गुंतवणुकीवर जादा नफ्याचा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून या महिलेची ३५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. महिलेची फसवणूक करून ज्या बँक खात्यात पैसे वळविले गेले, त्याचा उगम शोधत असताना सायबर पोलीस जुनैद कुरेशी (२१) याच्यापर्यंत पोहोचले. पीडित महिलेकडून मिळवलेली रक्कम जुनैद हाताळत असलेल्या बँक खात्यात जमा झाली होती.

सायबर पोलिसांनी आरोपीचा अधिक तपास केल्यानंतर कळले की चार आरोपींकडे जमा झालेला पैसा पाचवा आरोपी आकिफ अन्वर खान याच्याकडे दिला जात होता. आकिफ युएसडीटी या क्रिप्टोकरन्सीमार्फत फसवणुकीद्वारे मिळालेले पैसे हाँगकाँगमध्ये पाठवत असे.

हाँगकाँगमधून कारभार

या प्रकरणातील मुख्य आरोपी ग्रेग हा हाँगकाँग येथे वास्तव्यास आहे. तेथून तो फसवणुकीचे नेटवर्क चालवतो. हाँगकाँगमधून सोशल मीडियासाठी जाहिराती आणि लिंक तयार केल्या जातात. त्या जाहिराती पाहून संपर्क साधणाऱ्यांना लगेच फोन येण्यास सुरुवात होते. शेअर बाजारातील गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर असल्याचे सांगून गुंतवणुकीच्या बहाण्याने लाखो रुपये घेतले जातात. हे पैसे स्थानिक बँक खात्यांवर घेतले जातात. या रकमेचे कूटचलनात रूपांतर करून हाँगकाँगला पाठवले जाते. त्यासाठी स्थानिक पातळीवर काम करण्यांना काही रकिकम मिळते.

कमी शिकलेले आरोपी डिलीव्हरी बॉयचे काम करायचे

पुण्यात अटक केलेल्या आरोपींबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, आरोपींचे शिक्षण कमी आहे. तसेच त्यांची आर्थिक पार्श्वभूमीही कमकुवत आहे. आरोपी विविध कुरियर आणि जेवण डिलीव्हर करणाऱ्या कंपन्यात काम करतात. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले, “पाचही जणांनी शिक्षण अर्धवट सोडलेले आहे. डिलीव्हरीसारखे तात्पुरते काम करत असताना ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीच्या संपर्कात कसे आले? याचा आम्ही तपास करत आहोत. या प्रकरणात पीडितांना फोनद्वारे संदेश देणारे आणि विविध टास्क करायला सांगणारेही भारतीय नागरिकच असावे, असा आमचा कयास आहे.”

सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण स्वामी यांनी सांगितले की, आरोपींकडून आम्ही १२ बँकाचे डेबीट कार्ड, चेक बूक आणि अनेक मोबाइल फोन हस्तगत केले आहेत. तसेच पैसे मोजण्याचे यंत्र आणि सात लाख रुपयांची रोकडही जप्त केली आहे.