अधिक महिन्याचे वाण आणले नाही म्हणून सासरच्या मंडळीनी पेटविलेल्या धनश्री दिवेकर या महिलेचा गुरुवारी उपचारांदरम्यान मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील वरवंड येथील धनश्री दिवेकर या बारामतीतील एका महाविद्यालयात प्राध्यापक होत्या. या घटनेमध्ये त्या ८५ टक्के भाजल्या होत्या. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते.
मुळच्या बारामती तालुक्यातील गुनवडी येथील असलेल्या धनश्रीचा विवाह ३ जून २०१३ रोजी रोहन दिवेकर यांच्याशी झाला होता. अधिक महिन्याचे वाण म्हणून माहेराहून सोन्याची अंगठी आणण्याच्या मागणीवरून त्यांचा सासरच्या मंडळींसोबत वाद झाला. याच वादातून सासरच्या मंडळींना त्यांच्यावर रॉकेल ओतून त्यांना पेटविल्याचा आरोप आहे. ५ जुलै रोजी वरंवडमधील सासरच्या निवासस्थानी ही घटना घडली. पोलीसांनी तिच्या पती आणि सासू, सासऱयांना अटक केली आहे. धनश्रीला पाच महिन्यांचा मुलगाही आहे. केवळ हुंड्याच्या मागणीवरून उच्च शिक्षित महिलेला पेटविल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhanshri divekar died after burn injury
First published on: 23-07-2015 at 03:42 IST