आळंदीच्या नवीन पुलाचा लोखंडी कठडा तोडून इंद्रायणी नदीत वाहून गेलेल्या तवेरा मोटारीचा शोध लावण्यात शुक्रवारी सकाळी यश आले. मात्र, या मोटारीचे मालक आणि चालक हे नदीत वाहून गेले असून, त्यांचा शोध अद्याप लागलेला नाही. ही मोटार नदीतून बाहेर काढण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार मोटार नदीत कोसळली, त्यावेळी त्यामध्ये दोघेजण होते. मोटारीचे मालक संदीप जोगदंड आणि त्यांचा चालक त्यातून प्रवास करीत होते. या दोघांचा अजून शोध लागलेला नाही. तवेरा मोटार इंद्रायणी नदीत वाहून गेल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. घटनेची माहिती मिळताच पुणे, पिंपरी, आळंदी, एमआयडीसी अग्निशामक दलाच्या जवान आणि एनडीआरएफचे जवान अशा दोनशेच्या पथकाने मोटारीचा शोध घेण्यास सुरुवात केली
घटना घडली, त्यावेळी ही मोटार पुण्याकडून आळंदीकडे निघाली होती. आळंदी येथील नवीन पुलावर मोटारीने लोखंडी कठडा तोडून शेजारच्या पुलाला धडकली आणि दोन्ही पुलामधून इंद्रयाणी नदीत पडली.