scorecardresearch

Premium

डीएसके खटल्याची सुनावणी मुंबईतील विशेष न्यायालयात

गुंतवणूकदारांचे हितसंरक्षण कायद्यावन्ये या खटल्याची सुनावणी पुण्यातील न्यायालयात सुरू होती.

डीएसके खटल्याची सुनावणी मुंबईतील विशेष न्यायालयात

पुणे :  ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी खटल्याची सुनावणी मुंबईतील विशेष न्यायालयात वर्ग करण्यात येणार आहे. विशेष न्यायाधीश जयंत राजे यांनी बुधवारी याबाबतचे आदेश दिले.

गुंतवणुकीच्या आमिषाने ३५ हजार ठेवीदारांची ११०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णी यांच्या विरोधात महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण गुंतवणूक कायदा (एमपीआयडी)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाकडून (इडी) कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतील आर्थिक गैरव्यहार प्रतिबंधक विशेष न्यायालयात डीएसके खटल्याची सुनावणी वर्ग करण्याचे आदेश शिवाजीनगर न्यायालयातीाल विशेष न्यायाधीश जयंत राजे यांनी दिले आहेत.

Mumbai High Court on Sanatan Sanstha Vaibhav Raut
सनातन संस्थेच्या कथित सदस्याच्या घर-गोडाऊनमधून २० बॉम्ब जप्त, उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
Right to employment
विवाहित मुलींनाही अनुकंपा तत्त्वावर नोकरीचा अधिकार, न्यायालय काय म्हणाले सविस्तर जाणून घ्या…
supreme court canceled demolish order of 14 buildings in diva
दिव्यातील दोन हजार रहिवाशांना दिलासा; १४ इमारती तोडण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
Sachin Waze Mukesh Ambani
“अंबानी कुटुंबाच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी सचिन वाझेने…”, एनआयए न्यायालयाची मोठी निरिक्षणे

 या खटल्याची सुनावणी मुंबईतील विशेष न्यायालयात करण्यात यावी, अशी विनंती इडीकडून शिवाजीनगर न्यायालयाकडे करण्यात आली होती. याबाबत विशेष न्यायालयात पत्र देण्यात आले होते. त्यानुसार डीएसके खटल्याची सुनावणी आता मुंबईतील विशेष न्यायालयात होणार असून पुढील सुनावणी १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे, असे या खटल्यातील विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांनी सांगितले. या प्रकरणात आरोपींना अटक केल्यानंतर चार वर्षांनी खटला मुंबईतील विशेष न्यायालयात वर्ग करणे चुकीचे आहे. गुंतवणूकदारांचे हितसंरक्षण कायद्यावन्ये या खटल्याची सुनावणी पुण्यातील न्यायालयात सुरू होती. या खटल्यात ठेवीदारांना विशेष महत्त्व आहे. मुंबईतील विशेष न्यायालयात एकच न्यायाधीश ठेवीदार हितसंरक्षण कायदा तसेच सक्त वसुली संचालनालयाकडून दाखल करण्यात आलेल्या खटल्यांचे कामकाज चालविणार आहेत, असे डीएसकेंचे वकील अ‍ॅड. आशीष पाटणकर आणि अ‍ॅड. प्रतीक राजोपाध्ये यांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dsk case is being heard in special court in mumbai zws

First published on: 10-02-2022 at 03:32 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×