पुणे – नाशिक महामार्गावरील भोसरी येथे भरधाव डंपर दुकानात घुसल्याने तीन जण जखमी झाले. सुदैवाने यात मोठी जीवितहानी झाली नाही. भरधाव डंपरचे पुढील दोन्ही टायर फुटल्याने अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. डंपर दुभाजक तोडून दुसऱ्या लेनवर आला आणि रस्त्यालगत असलेल्या दुकानाला धडकला. या अपघातात एका मोटारीलाही धडक बसली असून दुकानातील एक कर्मचाऱ्यासह डंपर चालक जखमी झाला आहे. या घटनेत एकूण तीन जखमी झाले आहेत. बसवराज असं डंपर चालकाचे नाव असून गुन्हा दाखल करण्याच आला आहे. ही घटना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आहे. डंपर चाकणहून भोसरीच्या दिशेने येत होता. तेव्हा धावडे वस्तीजवळ येताच डंपरचे पुढील दोन्ही टायर फुटले, दुभाजक तोडून डंपर दुसरी लेन ओलांडताथेट दुकानात शिरला. लेन सोडून जात असताना डंपरने व्हॅगन आरला धडक दिली.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jul 2022 रोजी प्रकाशित
पुणे : पुणे-नाशिक महामार्गावर टायर फुटून डंपर दुकानात घुसला, ३ जण जखमी
भरधाव डंपरचे पुढील दोन्ही टायर फुटल्याने अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 18-07-2022 at 23:38 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dumper rammed into shop after tyre bursts on pune nashik highway 3 injured pune print news zws