ज्येष्ठ पत्रकार द्वारकानाथ लेले (वय ८१) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी निधन झाले. त्यांच्यामागे दोन विवाहित मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागातील प्रा. उज्ज्वला बर्वे या त्यांच्या कन्या होत.
टपाल खात्यामध्ये काही काळ काम केल्यानंतर लेले यांनी समाचार भारती या वृत्तसंस्थेचे पुण्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. ते साप्ताहिक सकाळ, सकाळची नाशिक आवृत्ती व साप्ताहिक स्वराज्यचे संपादक होते. तरुण भारत या दैनिकातही त्यांनी काम केले होते. पुण्यातील पत्रकारनगरच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान होते. सानेगुरुजी कथामाला, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कथाकथन प्रबोधिनी, सदाचार भारती, काव्यशिल्प यांसह पनवेल येथील शांतिवन वृद्धाश्रमाच्या कामातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. धार्मिक विधी न करता लेले यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Kishori Pednekar, pre-arrest bail,
करोना वैद्यकीय साहित्य खरेदीतील गैरव्यवहार प्रकरण : पोलिसांच्या ना हरकतीनंतर किशोरी पेडणेकर यांना अटकपूर्व जामीन
dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
Salary of West Vidarbha Higher Education Department employees finally deposited
पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर जमा; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रक्रियेला वेग
Savitribai Phule Pune University
‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’मध्ये आता गुद्द्यांची नवी संस्कृती; विद्यार्थी, विद्यार्थी संघटनांतील हिंसक प्रकरणांमध्ये वाढ