सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिकृत वीजजोड घेण्याचे आवाहन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांसाठी यंदाही महावितरण कंपनीच्या वतीने सवलतीच्या दरात वीजपुरवठा करण्यात येणार आहे. प्रतियुनिट ३ रुपये ७१ पैसे या घरगुतीपेक्षाही कमी असलेल्या दरात मंडळांना तात्पुरता वीजपुरवठा करण्यात येणार आहे. धोका टाळण्यासाठी मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी व गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

सर्व धर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांसाठी तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट महावितरणकडून ३ रुपये ७१ पसे अधिक इंधन अधिभार असे वीजदर आकारण्यात येतात. धार्मिक उत्सवांसाठी अधिकृतच वीजपुरवठा घेण्यास प्रोत्साहन मिळावे व त्यातून सार्वजनिक सुरक्षेला महत्त्व दिले जावे, यासाठी गणेशोत्सवातही तात्पुरत्या वीजजोडणीचा दर घरगुती वीजदरापेक्षा कमी ठेवण्यात आला आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीजयंत्रणा ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी व अìथगचीही खबरदारी घेण्यात यावी. वापरण्यात येणाऱ्या वाहिन्या वीजभारासाठी सक्षम नसल्यास शॉर्टसíकटचा धोका निर्माण होतो. याशिवाय सध्या पावसाळी दिवस असल्याने तसेच मंडपासाठी पत्र्यांचा वापर होत असल्याने वाहिन्या जोडलेल्या किंवा अनेक ठिकाणी तुटलेल्या असल्यास वीजपुरवठा खंडित होण्यासह अपघाताची मोठी शक्यता असते. गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्यूट्रलमूळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून जीवघेणे अपघात घडतात. त्यामुळे हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजसुरक्षेबाबत उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

तातडीच्या मदतीसाठी संपर्क

तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी २४ तास सुरू असणारे महावितरण कंपनीचे टोल फ्री क्रमांक १९१२, १८००२००३४३५ किंवा १८००२३३३४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय संबंधित क्षेत्रातील महावितरणचे अभियंता यांचे मोबाइल क्रमांक नोंदवून ठेवावेत. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा गणेशोत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Electricity getting in cheap rate to ganesh mandal
First published on: 16-08-2016 at 02:28 IST