वृक्षप्रेमींसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय ठरणाऱ्या एम्प्रेस गार्डनचा इतिहास आणि या उद्यानात असलेल्या वैशिष्टय़पूर्ण वृक्षांची माहिती तसेच बागेतील वृक्षांची सूची पुस्तकरूपाने उपलब्ध झाली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन उद्योगपती राहुल बजाज यांच्या हस्ते करण्यात आले.
एम्प्रेस गार्डनचे व्यवस्थापन अॅग्री हॉल्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्नन इंडिया या निसर्गप्रेमी संस्थेतर्फे केले जाते. बागेत येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना तसेच वृक्ष व निसर्गप्रेमींना वृक्षांची माहिती व्हावी, या उद्देशाने संस्थेने एक प्रकल्प हाती घेतला असून त्या अंतर्गत बागेतील प्रत्येक वृक्षाची माहिती देणारा फलक त्या त्या वृक्षावर लावण्यात येणार आहे. या फलकावर वृक्षाचे शास्त्रीय नाव, कुळ, उपलब्ध संस्कृत तसेच प्रचलित मराठी अथवा इंग्रजी नाव अशी माहिती असेल.
या प्रकल्पाबरोबरच बागेची माहिती देणारे पुस्तकही तयार करण्यात आले असून त्याचे प्रकाशन राहुल बजाज यांच्या हस्ते करण्यात आले. हे पुस्तक ज्येष्ठ वनस्पतितज्ज्ञ प्रा. श्री. द. महाजन आणि डॉ. पराग महाजन यांच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. त्यात एम्प्रेस गार्डनमधील वैशिष्टय़पूर्ण वृक्षांची माहिती, उद्यानाचा इतिहास, बागेतील वृक्षांची सूची आदी माहितीचा अंतर्भाव करण्यात आला आहे. प्रकाशन कार्यक्रमात संस्थेचे मानद सचिव सुरेश पिंगळे, उपाध्यक्ष सुमन किलरेस्कर, अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर, डॉ. फिरोज पूनावाला यांची प्रमुख उपस्थिती होती.
संग्रहित लेख, दिनांक 8th Nov 2015 रोजी प्रकाशित
एम्प्रेस गार्डनची माहिती पुस्तकरूपात
वृक्षप्रेमींसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय ठरणाऱ्या एम्प्रेस गार्डनचा इतिहास आणि या उद्यानात असलेल्या वैशिष्टय़पूर्ण वृक्षांची माहिती पुस्तकरूपाने उपलब्ध झाली आहे.
Written by दया ठोंबरे

First published on: 08-11-2015 at 03:35 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Empress garden information in book