राज्यातील अभियांत्रिकी शाखेचे प्रवेश अर्ज सोमवारपासून (२३ जून) उपलब्ध होणार असून कागदपत्रांच्या पडताळणीसाठी ३ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
राज्यातील अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेश प्रक्रियेची सुरूवात सोमवारपासून होणार आहे. २३ जून ते २ जुलैपर्यंत मदत केंद्रांवर प्रवेश अर्ज आणि माहितीपुस्तक मिळणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आणि कागदपत्रांची पडताळणी करून अर्ज निश्चित करण्यासाठी ३ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदत आहे. कच्ची गुणवत्ता यादी ५ जुलैला प्रसिद्ध होणार आहे. ६ जुलै ते ८ जुलै विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीवर आक्षेप नोंदवता येणार आहे. त्यानंतर ९ जुलै रोजी पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाच्या www.dtemaharashtra.gov.in/fe2014. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.