scorecardresearch

पिंपरी : पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी

आमदार लक्ष्मण जगताप यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्तांना एक पत्र पाठवले होते.

पिंपरी : पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी
पिंपरी : पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी

पिंपरी पालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शाळानिहाय नेत्र तपासणी शिबिर घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. करोना काळात ऑनलाइन शिक्षण घेतल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये डोळ्यांशी संबंधित अनेक आजार समोर आले होते. या पार्श्वभूमीवर, ही नेत्रतपासणी सुरू करण्यात आली.

हेही वाचा : कृषी उपसंचालकांना मिळणार बढती; ८१ जणांकडून मागविला पसंतीचा विभाग

आमदार लक्ष्मण जगताप यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्तांना एक पत्र पाठवले होते. पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी शिबीर घेण्याची सूचना त्यांनी पत्राद्वारे केली होती. त्याची दखल घेत शाळांमध्ये नेत्र तपासणी शिबिर घेण्याचे वेळापत्रक तयार करून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. या शिबिरांची जबाबदारी त्या त्या शाळांचे मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांवर सोपवण्यात आली आहे. याद्वारे डोळ्याशी संबंधित आजाराची लक्षणे दिसणाऱ्या विद्यार्थ्यांवर महापालिकेमार्फत योग्य उपचार करण्यात यावेत, अशी सूचना आमदार जगताप यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

मराठीतील सर्व पुणे न्यूज ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eye checkup of students in municipal schools in pimpri pune print news tmb 01

ताज्या बातम्या