पुणे : जयपूर-अत्रौली घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांचे पुत्र आणि प्रसिद्ध गायक राजशेखर मन्सूर (वय ८०) यांचे रविवारी बेंगळुरू येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे.
धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठामध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून अध्यापन कार्य केलेल्या राजशेखर यांना वडील पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांच्याकडून संगीताची तालीम मिळाली. आकाशवाणीचे उच्च क्षेणीचे गायक असलेल्या पं. राजशेखर यांनी देशभरातील महत्त्वाच्या संगीत महोत्सवांमध्ये गायन सेवा रुजू केली होती. संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना कर्नाटक सरकारने १९९७ मध्ये ‘राज्योत्सव’ पुरस्काराने सन्मानित केले होते. कर्नाटक संगीत नृत्य अकादमीचे अध्यक्षपद भूषविलेल्या पं. राजशेखर मन्सूर यांना कर्नाटक कलाश्री पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, उस्ताद बिस्मिल्ला खाँ पुरस्कार आणि चेन्नई येथील तानसेन अॅरकॅडमी ऑफ म्युझिकतर्फे पं. सन्ना भारमन्ना स्मारक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पं. राजशेखर मन्सूर यांच्या गायनाच्या ध्वनिफिती,तसेच सीडींचे भोपाळ येथील इंदिरा गांधी मानव संग्रहालयामध्ये जतन करण्यात आले आहे.

Sham Kurle
बालसाहित्य शाम कुरळे बेपत्ता; कोल्हापुरात दिसल्याचे काहींचे दावे
Senior educationist writer Meena Chandavarkar passed away
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका मीना चंदावरकर यांचे निधन
Govinda stopped the fleet of vehicles and bought shoe from small shop
गोविंदाला बुटाची भुरळ! रोड शो थांबवून खरेदी केले बूट; किंमत ऐकून तुम्ही म्हणाल…
jalgaon lok sabha latest news in marathi
जळगाव : उन्मेष पाटील यांच्या फलकातून कमळ गायब