उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने मुंबई, बोरीवली व ठाण्यासाठी पुण्याहून एसटीच्या दररोज २६७ गाडय़ा सोडण्यात आल्या आहेत. शिवनेर व हिरकणी या गाडय़ांचा त्यामध्ये समावेश आहे.
मुंबई व स्वारगेट या दोन्ही स्थानकांवरून दररोज अर्धा ते पाऊण तासाच्या अंतराने हिरकणी गाडय़ांच्या ३२ विनावाहन फेऱ्या सोडण्यात येत आहेत. स्वारगेट ते मुंबई सेंट्रलसाठी २१० रुपये प्रवासभाडे आहे. या ३२ फेऱ्यांशिवाय पुणे स्टेशन-दादर (पिंपरी- चिंचवडमार्गे) दररोज अहोरात्र ४२ हिरकणी निम-आराम बस सोडण्यात येत आहेत. या सेवेचे प्रवासभाडे १९५ रुपये आहे. पुणे स्टेशन-दादर मार्गावर १५ ते ३० मिनिटांच्या अंतराने वाकडमार्गे ६३, तर चिंचवड मार्गे ३१ वातानुकूलित शिवनेरी फेऱ्या सुरू आहेत. या प्रवासासाठी ३५५ रुपये भाडे आहे.
पुणे-ठाणे (वंदना) मार्गावर पहाटे पाचपासून अध्र्या तासाच्या अंतराने प्रयेकी शिवनेरी व निमआराम फेऱ्या सुरू आहेत. त्याचे भाडे अनुक्रमे ३५५ व १९५ रुपये आहे. स्वारगेट-बोरीवली मार्गावर सुमारे अर्धा तासाच्या अंतराने १७ शिवनेरी व १८ हिरकणी बस सोडण्यात येत आहेत.