‘विद्यार्थ्यांचे उपोषण नियमबाह्य़ असतानाही ते सुरूच ठेवल्यास पोलीस कारवाई होणे व उपोषणकर्त्यांला सरकारी रुग्णालयात दाखल करणे अपेक्षित आहे,’ असे सांगत ‘एफटीआयआय’चे संचालक प्रशांत पाठराबे यांनी उपोषणकर्त्यां विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा खर्च प्रशासन करू शकणार नसल्याचा खुलासा केला आहे.
संस्थेच्या संचालक मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष गजेंद्र चौहान यांना व इतर चार सदस्यांना हटवण्याच्या मुद्दय़ावरून सुरू असलेल्या संपात गुरुवारपासून विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात आतापर्यंत तीन विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी व शनिवारी खासगी रुग्णालयात दाखल करावे लागलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या उपचारांचा खर्च एफटीआयआय प्रशासनाने केला होता. मात्र रविवारी तिसऱ्या उपोषणकर्त्यांला खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले. या वेळी प्रशासनाने त्याच्यावरील उपचारांचा खर्च करण्यास नकार दिला.
‘उपोषणकर्त्यां विद्यार्थ्यांच्या बाबतीत पोलिसांनी कारवाई करणे व उपोषणकर्त्यांला सरकारी रुग्णालयात दाखल करणे अपेक्षित आहे,’ असेही पाठराबे यांनी खुलाशात म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Sep 2015 रोजी प्रकाशित
‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांचे उपोषण नियमबाह्य़!’
उपोषणकर्त्यां विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा खर्च प्रशासन करू शकणार नसल्याचा खुलासा संचालक प्रशांत पाठराबे यांनी केला आहे.
Written by दया ठोंबरे
Updated:

First published on: 14-09-2015 at 03:14 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ftii stundents hunger strike