वारजे भागात दुचाकीस्वारावर गोळीबार करून पसार झालेल्या गुंडाला पोलिसांनी अटक केली. नऱ्हे येथून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून पिस्तूल आणि तीन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. कार्तिक इंगवले (वय २३, रा. रामनगर, वारजे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

हेही वाचा- पुणे विमानतळावरील सर्वेक्षणात आणखी दोन प्रवाशांना करोना संसर्ग; रुग्णांची संख्या सहावर

Kidnapping of officer in case of embezzlement in Kolhapur Zilla Parishad
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील अपहारप्रकरणी अधिकाऱ्याचे अपहरण, मारहाण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त
Case against five persons in case of death of worker due to crane hook falling on head
पुणे : डोक्यात क्रेनचा हुक पडून कामगाराच्या मृत्यूप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा
vasai crime news, wife s murder accused marathi news
वसई: पत्नीच्या हत्येचा आरोपी पॅरोलवरून फरार, वालीव पोलिसांनी ५ वर्षानंतर केली अटक
Firing at Sand Ghat Clan wars erupted from disputes over supremacy
यवतमाळ : रेती घाटावर गोळीबार; वर्चस्वाच्या वादातून टोळीयुद्ध भडकले

इंगवले कोथरुडमधील गुंड निलेश घायवळ टोळीतील आहे. त्याच्या विरोधात पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. कारागृहातून तो बाहेर आला होता. १६ डिसेंबर रोजी त्याने वारजे भागात एका दुचाकीस्वारावर गोळीबार केला होता. याप्रकरणी वारजे पोलिसांनी त्याच्या तीन साथीदारांना अटक केली होती. इंगवले पसार झाला होता. वारजे पोलीस त्याच्या मागावर होते.

हेही वाचा- पुणे : नळस्टॉप चौकात सुशोभीकरण; वाहतूक कोंडीला निमंत्रण

इंगवले नऱ्हे भागात थांबल्याची माहिती तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा लावून इंगवलेला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले, पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा, सहायक आयुक्त रुक्मिणी गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे, रामेश्वर पारवे, हनुमंत मासाळ, बंटी मोरे, विजय भुरुक आदींनी ही कारवाई केली.