scorecardresearch

पुणे : पैसे मागितल्याने गुंडांचा पाणीपुरी विक्रेत्यावर चाकू हल्ला

राजेंद्रसिंग दयाराम जाठम (वय २२, रा. मंगळवार पेठ) असे जखमी झालेल्या पाणीपुरी विक्रेत्याचे नाव आहे.

Gangsters attack panipuri seller pune
पैसे मागितल्याने गुंडांचा पाणीपुरी विक्रेत्यावर चाकू हल्ला (प्रातिनिधिक छायाचित्र)

पाणीपुरी खाल्यानंतर पैसे मागितल्याने दोन गुंडांनी पाणीपुरी विक्रेत्यावर चाकूने वार केल्याची घटना शनिवारवाडा परिसरात घडली. राजेंद्रसिंग दयाराम जाठम (वय २२, रा. मंगळवार पेठ) असे जखमी झालेल्या पाणीपुरी विक्रेत्याचे नाव आहे.

हेही वाचा – “झेपत नसेल तर..”, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना केले लक्ष्य

हेही वाचा – पुणे : वडिलोपार्जित अडीच कोटी रुपयांच्या मालमत्तेचा अपहार, न्यायालयाच्या आदेशाने बहिणीसह मुलांवर गुन्हा

जाठम याने या संदर्भात फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जाठम शिवाजी रस्त्यावर पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतो. दोन दिवसांपूर्वी दोघेजण रिक्षातून शनिवारवाडा परिसरात आले. त्यांनी जाठम याच्याकडून पाणीपुरी घेतली. जाठम याने पाणीपुरीचे पैसे मागितले. तेव्हा दोघांनी त्याच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर शिवीगाळ करून दोघेजण रिक्षातून पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 16:32 IST
ताज्या बातम्या