शहराच्या विकासात अडथळे आणणाऱ्यांना नागरिक खड्यासारखे बाजूला ठेवतील, असे विधान करत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी विरोधकांना लक्ष्य केले. ते गुरुवारी पिंपरी-चिंचवड येथील उन्नत मेट्रो स्टेशन इमारतीच्या भूमीपूजन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी २०२० पर्यंत पिंपरी-चिंचवड ते रामवाडी मार्गावर मेट्रो धावायला लागेल, असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून बुधवारीच फुगेवाडी येथील कै. सौ.मिनाताई बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शाळेच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर बोलताना गिरीश बापट यांनी म्हटले की, विकासाची कामे सुरू असताना काही लोक राजकारण करतात. सत्तेच्या बाहेर गेलेली अस्वस्थ मंडळी अजूनही त्याच मानसिकेतत आहेत. लोकशाहीत सत्तारूढ आणि विरोधी पक्षांनी एकत्रितपणे काम करणे अपेक्षित आहे. त्यामुळे आम्ही विरोधकांकडून सहकार्याची अपेक्षा करतो. मात्र, ज्यांना इथे राजकारण करायचं असेल त्यांना जनता आणि आम्ही दोघेही थारा देणार नाही, असे बापट यांनी स्पष्ट केले.

गिरीश बापटांना बेताल वक्तव्यांची किंमत मोजावी लागेल – अजित पवार

शहरातील नागरिकांना आपला भाग सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा भाग सुजलाम सुफलाम करायचा आहे. त्यासाठी विविध पद्धतीचा विकास व्हायला पाहिजे. ज्यांना या माध्यमातून राजकारण करायचं आहे, ते त्यांनी खुशाल करावं. मात्र, आम्हाला समाजकारण करायचं आहे, असे बापट यांनी सांगितले. यावेळी महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, आमदार महेश लांडगे, खासदार अमर साबळे, आयुक्त श्रवण हर्डीकर आदी मान्यवर उपस्थित होते. वर्षभरानंतर सरकार बदलणार, असं खळबळ जनक वक्तव्य करणारे पालक मंत्री गिरीश बापट यांनी आता यावर भाष्य करणार नसल्याचं म्हटलं आहे.

‘सैराट बापटांच्या शिकवणीसाठी हेडमास्तर हवा’ पुण्यात राष्ट्रवादीची बॅनरबाजी