नाताळ सण साजरा करण्यासाठी चर्चमध्ये रात्री प्रार्थनेसाठी गेलेल्या एका कुटुंबाच्या सदनिकेतून चोरट्यांनी २४ लाख ७७ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना महंमदवाडी भागातील न्याती व्हिक्टोरिया सोसायटीत घडली. याबाबत एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शनिवारी (२४ डिसेंबर) रात्री फिर्यादी महिला आणि कुटुंबीय नाताळ सण साजरा करण्यासाठी बाहेर पडले.

हेही वाचा >>> पुणे: सॅलसबरी पार्क परिसरात तरुणावर चाकूने वार

girl Bangladesh sexually assaulted,
डोंबिवलीतील पलावा गृहसंकुलात दोन भावांकडून बांगलादेशमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
Nagpur Police, 11 Robbers, Three Crore Rupee Jewelry Heist, robbery in nagpur, nagpur robbery, crime in nagpur, one woman hostage by robbers,
एकटी राहणारी महिला; तीन कोटींच्या दागिन्यांची लूट, हजार सीसीटीव्ही…
Over thousand children are reunited with their families in a year with help of Railway Security Force
ताटातूट झालेल्या मुलांना पुन्हा मिळालं घर! रेल्वे सुरक्षा दलामुळे वर्षभरात हजारहून अधिक मुलांची कुटुंबीयांशी पुनर्भेट
chandigarh doctor grandfather sbi share 500 rupees in 1994 know profit
याला म्हणतात खरी गुंतवणूक! आजोबांनी ३० वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या ५०० रुपयांच्या शेअरवर नातू झाला लखपती

तक्रारदार महिला आणि कुटुंबीय चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गेले होते. सदनिकेच्या खिडकीची लाेखंडी जाळी उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाट उचकटून चोरट्यांनी १२ हजारांची रोकड, हिरेजडीत दागिने असा २४ लाख ७७ हजार रुपयांचा ऐवज लांबविला.

चर्चमध्ये प्रार्थना केल्यानंतर मध्यरात्री एकच्या सुमारास महिला आणि कुटुंबीय घरी परतले. तेव्हा घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. महिलेने कोंढवा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक संजय मोगले, सहायक निरीक्षक अनिल सुरवसे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे.