भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या निरीक्षणानुसार मार्चमधील उन्हाच्या झळांची तीव्रता आता राज्यभर जाणवू लागली आहे. शनिवारी कोकण आणि गोव्यात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली, तर उर्वरित ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्यानजीक पोहोचले आहे. सांताक्रूझ (मुंबई) येथे सर्वाधिक ३७.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची, तर पुण्यात १४.७ एवढय़ा सर्वात कमी किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ (३७.५), रत्नागिरी (३७.४), पणजी (३६.०), सोलापूर (३६.२), उस्मानाबाद (३५.३), परभणी आणि यवतमाळमध्ये (३५.०), नांदेड (३५.२), अकोला, अमरावती, वाशीममध्ये (३६.२), ब्रह्मपुरी (३६.९), वर्धा (३५.४) या ठिकाणी कमाल तापमानाने ३५ अंश सेल्सिअसचा पारा ओलांडला.

अंदाज काय?
’सोमवार (१३ मार्च) ते बुधवार (१५ मार्च) या काळात राज्यातील अनेक भागांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे.

As the temperature rises in the state of Maharashtra there is also an increase in the type of heat stroke pune
उष्माघाताच्या धोका! राज्यात रुग्णसंख्या ७७ वर; जाणून घ्या सर्वाधिक धोका कुठे…
Smuggling of liquor from Goa by vehicle stuff of worth 61 lakh seized
वाहनातून गोव्यातील मद्यसाठ्याची तस्करी, ६१ लाखाचा मुद्देमाल जप्त
Ambala Divisional Commissioner Renu Phulia
महिला आयएएस अधिकाऱ्याने २० वर्षांपूर्वीची स्थगिती उठवली, नवरा आणि मुलाने लगेचच खरेदी केला भूखंड
MHADA e-auction shops Mumbai
म्हाडाच्या मुंबईतील १७३ दुकानांचा ई लिलाव लांबणीवर; नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला ५ जूनपर्यंत मुदतवाढ

’कोकण आणि गोव्यात तुरळक तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी पडतील.

’पुणे आणि आसपासच्या परिसरात मंगळवार ते शुक्रवार-दरम्यान दुपारनंतर आकाश ढगाळ असेल. तसेच विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज आहे.