३६ हजारांहून अधिक रुग्णांसमोर जटील प्रश्न

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा करोना विषाणू संसर्गाने संपूर्ण कुटुंबे बाधित होण्याचे प्रमाण वाढत आहे, त्याचवेळी गृह विलगीकरणाची अंमलबजावणी करणेही अवघड जात आहे. संपूर्ण कु टुंबाला करोना संसर्ग झाल्यानंतर त्यांपैकी एखाद्या रुग्णाची लक्षणे वाढली, रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली तर कु टुंबातील कोणाला तरी रुग्णासोबत घराबाहेर पडण्याशिवाय पर्याय राहत नसल्याचे स्पष्ट होत आहे. शहरात सध्या ३६ हजारांहून रुग्णांनी गृह विलगीकरण स्वीकारले आहे.

अंजली (नाव बदलले आहे) आणि त्यांचे संपूर्ण कु टुंब करोनाबाधित झाले. त्यामुळे डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांनी गृह विलगीकरणाचा पर्याय स्वीकारला. कु टुंबातील ज्येष्ठ नागरिक महिलेची लक्षणे वाढली त्या वेळी अंजली आणि त्यांचे पती यांना रुग्णालयात खाट मिळवणे, रुग्णाला दाखल करणे या गोष्टी करण्यासाठी घराबाहेर पडावेच लागले. साहजिकच गृह विलगीकरणाचा कटाक्षाने अवलंब त्या करू शकल्या नाहीत. अंजली म्हणाल्या, घर मोठे आहे आणि घरातील सर्व जण बाधित आहोत, सौम्य लक्षणे आहेत म्हणून फॅमिली डॉक्टरांनी आम्हाला घरीच विलगीकरण पाळण्याबाबत सूचना के ल्या. मात्र सासूबाईंना त्रास जाणवू लागल्याने आम्हाला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी बाहेर पडावेच लागले. हे करताना मुखपट्टीचा वापर के ला, मात्र गृह विलगीकरण पाळता आले नाही, ही वस्तुस्थिती आहे. संदीप म्हणाले, माझी आई, वडील आणि मी तिघेही करोनाबाधित झाल्याने गृह विलगीकरणात राहण्यास सुरुवात के ली. वडिलांची लक्षणे वाढल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेणे आवश्यक होते. आम्ही करोनाबाधित असल्याने इतर कोणाला मदतीसाठी बोलवणे शक्य नव्हते. रुग्णालयात खाट मिळवणे, आवश्यक चाचण्या करणे यामुळे घराबाहेर पडावेच लागले. औषधे नेहमीच्या दुकानदाराने घरीच दिली, मात्र रुग्णालयात दाखल होताना पैसे भरणे, कागदपत्रे सादर करणे यांसाठी बरोबर माणूस लागतेच, त्यामुळे घराबाहेर पडण्याशिवाय पर्याय नव्हता.

बाहेर पडताना घ्या ही काळजी

’ शक्यतो मित्र परिवार, नातेवाईक यांची मदत घ्या.

’ रुग्णाबरोबर बाहेर पडण्यास कोणीही नसेल तर खासगी वाहनाने प्रवास करा.

’ चाचणीमध्ये करोना संसर्ग आहे असे दिसले तर रुग्णाने घरात आणि बाहेर

’ पडतानाही सर्जिकल मास्क किं वा एन-९५ मास्क वापरावा.

’ गर्दीत न मिसळण्याचे भान ठेवावे.

’ रुग्णालय, बाह्य़रुग्ण विभाग आणि प्रयोगशाळा अशा ठिकाणी इतरांपासून

’ सहा फु टांचे अंतर ठेवावे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home isolation issue in front of more than 36000 covid 19 patients zws
First published on: 07-04-2021 at 00:04 IST