‘दि पूना र्मचट चेंबर’तर्फे उत्तमचंदजी ऊर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारे ‘आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार’ जाहीर झाले आहेत. राज्यस्तरावर देण्यात येणारा पुरस्कार यंदा ‘पंचशील रियालिटी’चे अध्यक्ष अतुल चोरडिया यांना देण्यात येणार आहे. चेंबरचे अध्यक्ष वालचंद संचेती यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. उपाध्यक्ष प्रवीण चोरबेले, सचिव जवाहरलाल बोथरा आणि पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
पुणे शहर स्तरावर देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी ‘कॉसमॉस को. ऑप. बँक लि.’चे कृष्णकुमार गोयल यांची तर चेंबरच्या सभासदांमधून दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी ‘रूपचंद उत्तमचंद कोयाळीकर’ पेढीचे संस्थापक बाळासाहेब कर्नावट निवड करण्यात आली आहे. वीरेन गवाडिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ पत्रकार महेंद्र बडदे यांना जाहीर झाला आहे.   
२२ जुलै रोजी पद्मावतीमधील अण्णा भाऊ साठे रंगमंदिर येथे सायंकाळी ५ वाजता हा पुरस्कार सोहळा होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे, महापौर चंचला कोद्रे, वेकफील्ड कंपनीचे अध्यक्ष मुकेश मल्होत्रा या वेळी उपस्थित राहणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ideal merchant award declared
First published on: 19-07-2014 at 02:45 IST