बारामती : शहरातील एका इमारतीतील सदनिकेत दाम्पत्य मृतावस्थेत सापडल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. दाम्पत्याच्या शरीरावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले असून, या घटनेने बारामती शहरात खळबळ उडाली आहे. सचिन वाघोलीकर आणि त्यांची पत्नी सारिका अशी मृतावस्थेत सापडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. जामदार रस्त्यावरील खत्री-पवार अपार्टमेंटमध्ये वाघोलीकर दाम्पत्य राहायला होते. सचिन यांचा मित्र शनिवारी सकाळी घरी आला. तेव्हा सदनिकेतील स्वयंपाकघरात सचिन आणि त्यांची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड, बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा : शेफ विष्णू मनोहर यांनी बनवली १० हजार किलोंची मिसळ; अजित पवार अन् चंद्रकांत पाटलांनीही मारला ताव, पाहा Video

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In baramati couple found dead in flat bodies are stabbed with sharp weapon pune print news rbk 25 css
First published on: 13-04-2024 at 18:17 IST