लोणावळा: लोणावळ्यात पाण्याची बाटली घेण्याचा बहाणा करून दुकानदार महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकवण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून लोणावळा पोलिस अज्ञात दोघांचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळ्यातील बाबरनगर येथे जनरल स्टोअरवर एक अज्ञात व्यक्ती पाण्याची बाटली विकत घ्यायची असा बहाणा करून आला.

हेही वाचा : Pune Killer Porsche : “पोलीस ठाण्यात अल्पवयीन आरोपीला पिझ्झा खायला दिला, ११ तासांनंतरही…”, आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप

आधी नॉर्मल बाटली द्या म्हटला, पुन्हा अज्ञात व्यक्तीने थंड बाटली द्या म्हणत पाण्याची बाटली घेत असताना महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. महिलेनेही प्रतिकार केला. महिलेने आरडाओरडा करताच अज्ञात व्यक्ती दुकानाबाहेर थांबलेल्या साथीदारासह दुचाकीवरून पसार झाला. या सीसीटीव्हीवरून लोणावळा पोलीस अज्ञात दोघांचा शोध घेत आहेत.