पुणे : गत वर्षभरात ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक पदावर कोणताही अधिकारी जास्त काळ राहत नसल्याचे चित्र आहे. त्यातच नवीन अधीक्षकांवर अतिरिक्त तीन जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या होत्या. ‘लोकसत्ता’ने याबाबत वृत्त देताच रुग्णालय प्रशासनाने तातडीने त्यांना अतिरिक्त जबाबदाऱ्यांतून मुक्त केले आहे. ससून रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठे सरकारी रुग्णालय आहे. या रुग्णालयात दररोज हजारो नागरिक येतात. आजारपणाव्यतिरिक्त इतर सरकारी प्रमाणपत्रांसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी असते. यात अपंगत्वाची प्रमाणपत्रे, वैद्यकीय प्रतिपूर्ती यासह इतर महत्त्वाची कामे असतात.

मागील वर्षभरात पाच अधीक्षक रुग्णालयाने पाहिले आहेत. मे महिन्यात डॉ. यल्लपा जाधव यांची अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर तीनच महिन्यांत त्यांना हटवून नुकतीच डॉ. सुनील भामरे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली. डॉ. भामरे यांच्यावर वैद्यकीय अधीक्षक पदासोबत बीजे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासकीय अधिकारी, राष्ट्रीय वैद्यकीय परिषद आणि बायोमेट्रिक या विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यावर त्यांनी अतिरिक्त जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्याकडे केली होती. अधीक्षकपदी काम करण्यासाठी पूर्णवेळ देता यावा आणि चांगल्या पद्धतीने काम करता यावे, यासाठी त्यांनी अधिष्ठात्यांना पत्रही लिहिले होते.

Dr Dharmesh Patel California accident
स्वतःच्या कुटुंबालाच मृत्यूच्या दरीत ढकल्यानंतर भारतीय व्यक्तीला अटक, सुनावणी सुरू असताना समोर आली धक्कादायक माहिती
न्यायालयीन प्रक्रियेच्या दुरुपयोगासाठी जनहित याचिका नको; याचिकाकर्त्यांना ५० हजार रुपयांचा दंड
Sassoon, pune, Sassoon dean,
ससूनमध्ये वाद पेटला! आयुक्तांच्या निर्णयाच्या विरोधात अधिष्ठात्यांची थेट भूमिका
Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा

हेही वाचा : ‘एटीएस’चा कुरुलकरच्या जामिनास विरोध

याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच ससून रुग्णालय प्रशासनाने डॉ. भामरे यांच्याकडील अतिरिक्त जबाबदाऱ्या काढून घेतल्या आहेत. त्यांच्याकडे आता फक्त वैद्यकीय अधीक्षकपदाची जबाबदारी आहे. ‘सध्या माझ्याकडील अतिरिक्त जबाबदाऱ्या रुग्णालय प्रशासनाने काढून घेतल्या आहेत. माझ्याकडे आता फक्त वैद्यकीय अधीक्षकपदाचा कार्यभार आहे. त्यामुळे या कामासाठी आता मला पूर्ण वेळ देता येईल’, ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील भामरे यांनी म्हटले आहे.