पुणे : विवाह नोंदणी संकेतस्थळावर झालेली ओळख संगणक अभियंता तरुणीला महागात पडली. चोरट्याने विवाहाच्या आमिषाने तरुणीची ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार राजेश शर्मासह साथीदारांविरुद्ध फस‌वणूक, तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुणी खराडी भागातील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत अभियंता आहे. तिने एका विवाह नाेंदणी संकेतस्थळावर नोंदणी केली होती. संकेतस्थळावर तिचा राजेश शर्माशी परिचय झाला. शर्माने परदेशातील एका कंपनीत अधिकारी असल्याची बतावणी केली होती. शर्माने विवाहास होकार दिल्यानंतर त्यांच्यातील संपर्क वाढला.

हेही वाचा : पुणे महापालिकेला अखेर जाग! खासगी रुग्णालयांबाबत उचलली पावले

Mohammed Abdul Arfath found dead in US
अमेरिकेत मुलाचा मृत्यू, डोक्यावर ४३ लाखांचे शैक्षणिक कर्ज; भारतीय विद्यार्थ्याच्या कुटुंबाची करुण कहाणी
drugged woman high voltage drama caught on camera strips naked demands sex at jamaica airport video viral
नग्नावस्थेत महिलेचा विमानतळावर धिंगाणा! नशेत तिच्याकडून शरीरसंबंधाची मागणी; VIDEO व्हायरल
couple sleep on seat together Passengers angry post on couples on flight goes photo viral
Photo : हद्दच झाली राव! विमानात कपलचे अश्लील चाळे, प्रवाशांसमोर सीटवर झोपून…
prashant kishor on bjp in loksabha election 2024
Video: २०२४च्या निवडणुकीत भाजपाचं काय होणार? प्रशांत किशोर यांनी मांडलं गणित; म्हणाले, “यावेळी पहिल्यांदाच…”

त्याने लवकरच भारतात स्थायिक होणार असून, व्यवसाय सुरू करणार असल्याचे तरुणीला सांगितले. बनावट विमान प्रवासाचे तिकिट तिला पाठविले. त्यामुळे तरुणीच्या विश्वास बसला. त्यानंतर त्याने विमानाने दिल्लीत येणार असल्याचे सांगितले. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (कस्टम) चौकशी सुरू केली आहे. परदेशी चलनाबाबत चौकशी करण्यात येत असल्याचे त्याने सांगितले. तातडीने काही शुल्क जमा करावे लागेल, असे सांगून त्याने तरुणीला बँक खात्यात त्वरित पैसे जमा करण्यास सांगितले. तरुणीने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. त्याने सांगितलेल्या बँक खात्यात तिने ४० लाख ५० हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर शर्माने त्याचा मोबाइल क्रमांक बंद केला. तरुणीने त्याच्याशी संपर्क साधला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली.