पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा खासदार अमोल कोल्हे यांना चॅलेंज दिले आहे. एकदा चॅलेंज हाती घेतलं तर ते मी पूर्ण करतो आणि जिंकूनच दाखवतो ही गोष्ट लक्षात ठेवा. निकाल लागल्यानंतर तुम्हाला कळेल, असा थेट इशारा अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना दिला आहे. अजित पवार हे पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा : पिंपरी: उपमुख्यमंत्री अजितदादांना बालेकिल्यात धक्का, माजी महापौर ठाकरे गटाच्या गळाला?

Eknath Shinde Chhagan Bhujbal (1)
अमोल कोल्हेंविरोधात शिरूरमधून लोकसभेची ऑफर होती? भुजबळ म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी मला…”
ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
Tanaji Sawant, Archana Patil, Tanaji Sawant silence,
अर्चना पाटील उमेदवारीनंतर समर्थकांच्या आंदोलनावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे मौन
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!

अजित पवार म्हणाले, “अमोल कोल्हे यांना वाटलं ते त्यांनी म्हटलं. मला जे वाटलं ते मी म्हटलं. आता तेच कितीदा उगाळून काढणार? मला नाही आवडत तसं.” पुढे ते म्हणाले, “आता बघा, अजित पवार एखादं चॅलेंज देतो त्यावेळेस जिंकूनच दाखवतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल.” पुढे ते म्हणाले, “त्या व्यक्तीला (अमोल कोल्हेंना) चांगल्या भावनेतून मी पक्षात घेतलं. त्यांना खासगीत विचारा की तुम्हाला कुणी पक्षात घेतलं. तिकीट देत असताना कोणी शब्द दिला. सर्व गोष्टी इमानदारीने केलेल्या आहेत. निवडून आल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या काय मनात आलं राजीनामा द्यायचा, ते सातत्याने सांगत होते. कुणी राजीनामा देण्यापासून थांबवलं त्यांना विचारा! सहा मतदारसंघात संपर्क ठेवायचा होता तो त्यांनी दुर्दैवाने ठेवला नाही. आता त्यांचं मन त्यांना आतून खात आहे.”