पिंपरी: उपमुख्यंमत्री अजित पवार हे पिंपरी-चिंचवड शहरात असतानाच त्यांना मोठा धक्का बसला आहे. शहराचे माजी महापौर संजोग वाघेरे यांनी मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. वाघेरे लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पवार गटाला धक्का बसण्याची चिन्हे आहेत.

मातोश्रीवर झालेल्या भेटीदरम्यान खासदार संजय राऊत, राज्य संघटक एकनाथ पवार, ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचिन भोसले, जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, योगेश बाबर उपस्थित होते.

Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”
rohit pawar, supriya sule, baramati lok sabha
अजित पवारांनी केलेल्या सर्वेक्षणात सुप्रिया सुळे आघाडीवर; रोहित पवार म्हणाले, “सुप्रिया सुळे अडीच लाख मतांनी…”
Pimpri chinchwad ncp Former Mayor Sanjog Waghere met Uddhav Thackeray Waghere join the Thackeray group
अजित पवार गटाला धक्का; संजोग वाघेरेंचा ठाकरे गटात प्रवेश; म्हणाले, “या मंडळींनी…!”
Mahavikas Aghadi Sanjog Waghere has been nominated by the Thackeray group pune news
महाविकास आघाडीचा पहिला उमेदवार ठरला, संजोग वाघेरे यांना ठाकरे गटाकडून मावळची उमेदवारी

हेही वाचा… राजकारण्यांमध्ये नाटकवाल्यांना मागे टाकतील असे कसलेले नटसम्राट… उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तुफान फटकेबाजी

संजो वाघेरे हे मावळमधून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. मागील वेळी त्यांनी जोरदार तयारी केली होती. पण, ऐनवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे वाघेरे यांना माघार घ्यावी लागली होती. आता महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जागा सुटण्याची शक्यता असल्याने वाघेरे यांनी ठाकरे गटाच्या पर्यायाची चाचपणी सुरु केल्याचे दिसते. राष्ट्रवादीतील फुटीनंतर वाघेरे हे अजित पवार यांच्यागटात होते. पवार शहरात असतानाच वाघेरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने अजितदादांना धक्का बसण्याची शक्यता आहे. वाघेरे यांना ठाकरे गटाकडून मावळमधून उमेदवारी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.