पुणे : शहरात सकाळी हलका पाऊस झाला. पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने रस्ते निसरडे झाले. सेनापती बापट रस्ता, कोथरुड परिसरात दुचाकी घसरल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही. शहरात शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास हलका स्वरुपाचा पाऊस झाला. पावसाच्या एक ते दोन सरी कोसळल्यानंतर रस्ते निसरडे झाले. रस्ते निसरडे झाले. सकाळी कामावर निघालेले दुचाकीस्वार रस्ते निसरडे झाल्याने घसरून पडल्याच्या घटना घडल्या. सेनापती बापट रस्ता, पौड रस्ता, कोथरुड परिसरात दुचाकी घसरल्याच्या घटना घडल्या, अशी माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

हेही वाचा : देशातील बियाणे उद्योगाची स्थिती काय? जाणून घ्या. बियाणे उद्योगाची उलाढाल

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune rain started in early morning two wheelers slip on road pune print news rbk 25 css
First published on: 01-03-2024 at 09:57 IST