पुणे : राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) आवारात बाबरी मशीद पाडल्याच्या निषेधार्थ फलक लावल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी ‘एफटीआयआय’मधील विद्यार्थी संघटनेच्या सात पदाधिकाऱ्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सायनतन चरण चक्रवर्ती, नाथन चक्रपाध्याय, मनकलन चक्रवर्ती, त्रिशा बंदना मन्ना, मधुरिमा मगन्का मैती, मनकप सेलोन नोकवोहम, रितागनिकी देबारती भट्टाचार्या अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत ऋतुजा अतुल माने (रा. कोथरुड) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा…‘एफटीआयआय’च्या आवारात बाबरी मशिदीबाबत वादग्रस्त फलक, विद्यार्थी संघटनांमध्ये बाचाबाची

माने समस्त हिंदू बांधव सामाजिक संस्थेच्या महिला अध्यक्षा आहेत. ‘एफटीआयआय’च्या आवारात मंगळवारी ‘रिमेंबर बाबरी डेथ ऑफ कॉनस्टिट्यूशन’ अशा आशयाचे फलक लावण्यात आल्याची माहिती मंगळवारी दुपारी मिळाली.त्यानंतर माने याबाबतची माहिती संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पडवळ आणि कार्यकर्त्यांना दिली. ‘एफटीआयआय’च्या आवारात स्टुडंट्स असोसिएशनने फलक लावल्याची माहिती मिळाली. अशा प्रकारच्या फलकामुळे सामाजिक ऐक्याला बाधा पोहचण्याची शक्यता आहे. धार्मिक सलोखा बिघवडविण्याचे काम विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याचे माने यांनी फिर्यादीत म्हटले आहे. डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिपीन हसबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune student union showed banner against demolition of babri masjid at ftii campus police registered fir pune print news rbk 25 psg
First published on: 24-01-2024 at 11:00 IST