पुणे : देशातील कर्करुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कर्करोग कमी वयात जडण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. पुरुषांमध्ये फुप्फुस, मुख, प्रोस्टेट कर्करोग आणि महिलांमध्ये स्तन, गर्भाशय, अंडाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. अपोलो हॉस्पिटलने जाहीर केलेल्या राष्ट्रीय आरोग्य अहवालातून हे वास्तव समोर आले आहे.

राष्ट्रीय आरोग्य अहवालानुसार, जागतिक पातळीवरील कर्करुग्णांच्या तुलनेत भारतातील कर्करुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशात कर्करोग होण्याचे सरासरी वय कमी झाले आहे. स्तनाचा कर्करोग होण्याचे सरासरी वय भारतात ५२ वर्षे असून, अमेरिका आणि युरोपमध्ये ६३ वर्षे आहे. फुप्फुसाचा कर्करोग होण्याचे सरासरी वय भारतात ५९ वर्षे असून, पाश्चिमात्य देशांमध्ये ते ७० वर्षे आहे. मोठ्या आतड्याचा कर्करोग होण्याचे सरासरी वय भारतात ५० वर्षे आहे.

prashant kishor on bjp in loksabha election 2024
Video: २०२४च्या निवडणुकीत भाजपाचं काय होणार? प्रशांत किशोर यांनी मांडलं गणित; म्हणाले, “यावेळी पहिल्यांदाच…”
pm narendra modi interview marathi (1)
Video: तपास यंत्रणांच्या गैरवापराबाबत नरेंद्र मोदींना थेट प्रश्न; उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले…
mva press conference seat sharing for loksabha election 2024
सांगलीची जागा अखेर काँग्रेसनं सोडली; महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर, पाहा कोण कुठून निवडणूक लढवणार?
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’

आणखी वाचा-ताटातूट झालेल्या मुलांना पुन्हा मिळालं घर! रेल्वे सुरक्षा दलामुळे वर्षभरात हजारहून अधिक मुलांची कुटुंबीयांशी पुनर्भेट

कर्करोगाचे प्रमाण वाढत असताना त्याची तपासणी करण्याचे प्रमाण कमी आहे. स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीचे प्रमाण भारतात १.९ टक्के असून, अमेरिकेत ते ८२ टक्के, ब्रिटनमध्ये ७० टक्के आणि चीनमध्ये २३ टक्के आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी करण्याचे प्रमाण भारतात ०.९ टक्के असून, अमेरिकेत ७३ टक्के, ब्रिटनमध्ये ७० टक्के आणि चीनमध्ये ४३ टक्के आहे, असे अहवालात म्हटले आहे.

भारतीयांमध्ये लठ्ठपणा वाढत असल्याचेही अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे. ‘अपोलो’मध्ये तपासणी झालेल्या चारपैकी तिघा जणांमध्ये लठ्ठपणा आढळून आला आहे. लठ्ठपणाचे प्रमाण २०१६ मध्ये नऊ टक्के होते. ते २०२३ मध्ये २० टक्क्यांवर पोहोचले आहे. देशातील तीनपैकी दोन जण उच्च रक्तदाबाच्या विकाराकडे जात आहेत. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचे प्रमाण २०१६ मध्ये नऊ टक्के होते, ते २०२३ मध्ये १३ टक्क्यांवर पोहोचले. देशात तीनपैकी एका व्यक्तीला पूर्वमधुमेह असून, दहापैकी एकाला अनियंत्रित मधुमेह आहे. याचबरोबर दहापैकी एकजण नैराश्यग्रस्त आहे. नैराश्याचे प्रमाण १८ ते ३० या वयोगटात आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठांमध्ये सर्वाधिक आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आणखी वाचा-‘लव्ह जिहाद’च्या आरोपावरून मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल; पुणे विद्यापीठाच्या आवारातील घटना

अहवालातील ठळक मुद्दे

  • कर्करोगाचा धोका कमी वयात
  • कर्करोगाच्या तपासणीचे प्रमाण कमी
  • चारपैकी तीन जणांमध्ये लठ्ठपणा
  • तीनपैकी दोन जणांना उच्च रक्तदाब
  • दहापैकी एकाला अनियंत्रित मधुमेह
  • तीनपैकी एकाला पूर्वमधुमेह
  • दहापैकी एक जण नैराश्यग्रस्त