पुणे : विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आस्था आणि ओढ निर्माण होण्यासाठी विदर्भात 27 जून रोजी आणि उर्वरित राज्यात 15 जून रोजी प्रवेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शाळेच्या परिसरातील 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याची खात्री करून शाळापूर्व तयारीच्या काळात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रवेश द्यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी परिपत्रकाद्वारे शिक्षण संचालक, विभागीय उपसंचालक,  जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांना परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. शैक्षणिक वर्ष 2022-23मधील शाळा 15 जून आणि विदर्भातील शाळा 27 जून रोजी सुरू होणार आहेत. गेल्या दोन वर्षांत करोना परिस्थितीमुळे राज्यातील विद्यार्थ्यांचे नियमित शाळेत येणे बंद होते. या काळात शैक्षणिक अध्ययन कमाल पातळीपर्यंत असल्याचे स्पष्ट दिसून येत नाही. तसेच शाळांतील शैक्षणिक सोयीसुविधा अस्ताव्यस्त झाल्याचे नाकारता येत नाही असे नमूद करण्यात आले आहे. 

How many applications filed under RTE only two days left to fill the application
आरटीई अंतर्गत किती अर्ज दाखल? अर्ज भरण्यासाठी राहिले दोनच दिवस!
challenged to RTE new rules in High Court
पालक, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे! ‘आरटीई’ नव्या नियमांना उच्च न्यायालयात आव्हान
Mata Mahakali Yatra in Chandrapur to Commence on 14 April
१४ एप्रिलपासून माता महाकालीच्या यात्रेला सुरूवात; एक महिना चालणार यात्रा, तयारी पूर्ण
english medium schools in pune advertising on social media to attract students
पुणे: इंग्रजी शाळांवर समाजमाध्यमांत जाहिराती करण्याची वेळ… नेमके झाले काय?

शाळा सुरू होण्याच्या दिवशी विद्यार्थ्यांचे प्रभावी, दर्जेदार स्वागत होणे अपेक्षित आहे. फूल देऊन किंवा शालेय उपयोगी साहित्य देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करावे. विद्यार्थ्यांमध्ये शाळेत उपस्थित राहण्याची आवड निर्माण होण्यासाठी शाळेतील वातावरण चैतन्यमय आणि उत्साहवर्धक राहण्याचे व्यवस्थापन करावे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी नजीकच्या दगडखाणी, वीटभट्टी, बाजारपेठा, पदपथ, कामगार वस्त्या अशा ठिकाणी सर्वेक्षण करावे. गेली दोन वर्षे विद्यार्थी शाळेत प्रत्यक्ष उपस्थित नसल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या किमान पातळीपर्यंत आणण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षक यांच्याशी विचारविमर्श करून अध्ययन निष्पत्तीसाठी उपाययोजना, सेतू अभ्यासक्रम, इतर शैक्षणिक साधनांची प्रभावी अंमबजावणी करण्याबाबत सहकार्य करावे. शाळा प्रवेशाच्या पहिल्या दिवशी प्रत्येक अधिकाऱ्याने किमान एका शाळेत जाऊन विद्यार्थी शिक्षकांचे मनोबल उंचावण्यासाठी उद्बोधन करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.