ओल्या भेळेची सगळी गंमत असते ती त्या भेळेसाठी वापरल्या जाणाऱ्या चिंच, गुळाच्या चटकदार पाण्यात. हे पाणी भेळेला चविष्ट बनवतं. इंटरव्हल भेळेचं वैशिष्टय़ं हे, की असं चटकदार पाणी तुम्ही इथे हवं तेवढं घेऊ शकता. म्हणजे प्रत्येक टेबलवर या चटकदार पाण्याच्या लोटय़ा भरून ठेवलेल्या असतात.

भेळेच्या हातगाडय़ा शहरात काही ठिकाणी उभ्या राहायच्या असा तो काळ होता. सुमारे पन्नासएक वर्षांपूर्वीच्या अशा त्या काळात फक्त भेळेची विक्री करण्यासाठी कोणी दुकान सुरू करणं ही आगळी कल्पना होती. त्या आधी भेळेची काही दुकानं पुण्यात सुरू झालेली होती. पण रास्ता पेठेसारख्या भागात सुरू झालेलं इंटरव्हल भेळ हे दुकान तसं एकुणात अप्रूपच होतं. लक्ष्मण शंकर जोशी यांनी १९६८ मध्ये हा भेळेचा व्यवसाय सुरू केला आणि त्याला यंदा पन्नास वर्ष होत आहेत. नाशिकहून पुण्यात आलेल्या जोशी यांनी सुरुवातीला शिवणकाम, दूध डेअरी, किराणामाल विक्री असे काही व्यवसाय केले. ते सामाजिक कामांमध्येही अग्रभागी असतं. ते उत्तम कवी होते. एका निवडणुकीत कार्यकर्ता म्हणून ते मुंबईला गेले होते आणि त्या वेळी त्यांनी तिथले भेळवाल्यांचे ठेले बघितले. अशाप्रकारचा व्यवसाय आपण पुण्यात सुरू करू शकतो अशी कल्पना त्यांना सुचली आणि पुण्यात आल्यानंतर त्यांनी रास्ते वाडय़ात इंटरव्हल भेळ या नावानं या व्यवसायाला प्रारंभ केला. पुढे १९८० मध्ये हा व्यवसाय नव्या जागेत गेला.

thane air quality marathi news, thane air quality index marathi news,
ठाण्याची हवा समाधानकारक, हवेचा गुणवत्ता निर्देशांक ६५ ते ८५ च्या आत
Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Mumbai Swelters, Heatwave Grips, mumbai Citizens Advised, Take Precautions, summer in mumbai, heatwave in mumbai, precautions from sunstroke, sunstroke in mumbai,
उन्हाच्या तडाख्याने मुंबईकर हैराण
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा

बादशाही भेळ, भडंग भेळ आणि फरसाण भेळ हे इथे मिळणारे भेळेचे तीन प्रकार. बादशाही म्हणजे चुरमुरे वापरून केलेली आपली नेहमीची ओली भेळ. भडंग भेळेसाठी मसाला भडंग वापरले जातात, तर फरसाण भेळेसाठी फक्त फरसाण वापरलं जातं. या शिवाय पाणीपुरी, शेवपुरी हेही इथले चविष्ट प्रकार प्रसिद्ध आहेत. फक्त भेळेसाठीच सुरू केलेलं हे दुकान असल्यामुळे इथे अन्य कोणतेही खाद्यपदार्थ ठेवले जात नाहीत. लोकांनी भेळेच्या आस्वादासाठीच इथे निवांतपणे यावं, मनसोक्त भेळ खावी अशी जोशी कुटुंबीयांची इच्छा असते आणि त्यामुळे भेळ, पाणीपुरीखेरीज इथे अन्य पदार्थ नाहीत.

ओल्या भेळेची खासियत असते भेळेच्या पाण्यात. ते भेळेला चटकदार बनवतं. भेळ खायला सुरुवात केल्यानंतर आणखी थोडं पाणी भेळेवर हवं असं वाटलं की समजावं पाणी चटकदार बनलं आहे. अर्थात हे पाणी तुम्हाला हवं तेवढं मिळालं तर.. इंटरव्हल भेळमध्ये तशी व्यवस्था पहिल्यापासून आहे. इथे प्रत्येक टेबलवर चटकदार पाण्याच्या लोटय़ा भरून ठेवलेल्या असतात. त्यातलं हवं तेवढं पाणी तुम्ही तुमच्या भेळेवर घेऊ शकता. पाणीपुरी देखील अशाच पद्धतीनं इथे दिली जाते. म्हणजे एका बशीत पाणीपुरीच्या पुऱ्या दिल्या जातात आणि रगडा, पुदिन्याचं पाणी, आंबट गोड पाणी वेगळं दिलं जातं. ते घेऊन आपण आपल्याला रुचीनुसार पाणीपुरी तयार करायची आणि आस्वाद घ्यायचा, अशी इथली पद्धत आहे.

लक्ष्मण जोशी यांचे पुत्र प्रशांत आणि पुढची पिढी म्हणजे केदार हे आता या व्यवसायात आहेत. वडिलांनी जशा पद्धतीनं हा व्यवसाय चालवला त्याबरहुकूम म्हणजे अगदी पन्नास वर्षांपूर्वीच्याच तंत्रानं हा व्यवसाय प्रशांत जोशी यांनी चालवला आहे. त्यामुळेच इथे भेळ खायला येणाऱ्यांच्याही तिसऱ्या, चवथ्या पिढय़ा येतात आणि पूर्वी जी चव होती तीच आजही टिकून आहे असा अभिप्राय आवर्जून देतात. पदार्थाची चव अशी वर्षांनुवर्ष टिकवणं हे तसं अवघड काम आहे. पण इंटरव्हल भेळेला ते जमलं आहे. भेळेसाठी चुरमुरे, फरसाण, कांदा, कोथिंबीर, मिरची, चिंच, गूळ असे जे जे घटक पदार्थ वापरले जातात, ते सगळे उत्तम प्रतीचेच असतील याकडे प्रशांत आणि केदार यांचं सतत लक्ष असतं. त्यामुळे भेळेचा दर्जा उत्तम राहतो. चिंचेच्या पाण्यासाठीची चिंच देखील ठरावीक भागातूनच घेतली जाते. गूळ देखील कराडचा घेतला जातो. कांदा भरमसाठ कापून ठेवायचा नाही, लागेल तसा कापायचा आणि तोही यंत्रावर न कापता लांब पात्याच्या सुरीनं नाजूकपणे कापायचा अशी अनेक तंत्र इथे सांभाळली जातात. हा परिपाठही दुकान सुरू झालं तेव्हापासूनचा आहे. ज्यांना भेळेचं पार्सल हवं असतं त्यांच्यासाठीही इथे छान व्यवस्था आहे. शिवाय इथली स्वच्छता, टापटीप, नेटकेपणाही नजरेत भरण्यासारखा असतो.

ओली भेळ असो किंवा पाणीपुरी, शेवपुरी हे सगळे चटपटीत, चविष्ट असे प्रकार आहेत. या पदार्थाचा चटकदारपणा म्हणजे काय त्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर इंटरव्हल भेळला अवश्य भेट द्यावी.

इंटरव्हल भेळ

  • कुठे ? ५०१ रास्ता पेठ, रास्ते वाडा
  • कधी? दुपारी चार ते रात्री साडेनऊ

vinayak.karmarkar@expressindia.com