पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कसबा पोटनिवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (२ मार्च) कोरेगाव पार्क भागातील अन्न धान्य महामंडळाच्या गोदामात होणार आहे. या भागात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहेत.

मतमोजणी केंद्र परिसरात शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. शस्त्र परवाना असलेल्या व्यक्तींना शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. पोलीस, संरक्षण दल, कारागृह विभाग, बँक सुरक्षा विभाग, तसेच केंद्रीय आणि राज्य शासनाचे अधिकारी यांना शस्त्र बाळगण्याबाबत दिलेल्या आदेशातून सूट देण्यात आली आहे. मतमोजणी केंद्र परिसरात मोबाइल संच, बिनतारी दूरध्वनी यंत्रणा (काॅर्डलेस फोन) वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्र परिसरात पक्षाच्या कार्यकर्त्यांना ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास मनाई करण्यात आल्याचे सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले.

gondia lok sabha seat, Technical Glitch in evm, evm machine, Gondia Polling Station, two Hours Delays Voting, arjuni moragaon, tilli mohgaon, polling news, polling day, gondia polling new
गोंदिया : ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचण; मतदान प्रक्रिया दोन तास बंद
onion, Dindori, loksabha election 2024,
दिंडोरीत कांदा प्रचाराच्या केंद्रस्थानी
Northwest Mumbai beautification of Jogeshwari Caves is sometimes under construction awaiting rehabilitation
आमचा प्रश्न : वायव्य मुंबई – जोगेश्वरी गुंफेचे सुशोभीकरण कधी प्रकल्पबाधितही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
Submerged area of proposed Poshir Dam soil survey to start soon
प्रस्तावित पोशीर धरणाच्या बुडित क्षेत्र, माती सर्वेक्षणाला लवकरच प्रारंभ

हेही वाचा – नागपुरात शिट्टी वाजवल्यानंतर चर्चांना उधाण, भाजपात प्रवेश करणार का? अमोल कोल्हे म्हणाले…

मतमोजणी केंद्र परिसरात कोणताही मजकूर लिहिण्यास किंवा छापील मजकूर चिटकवण्यास मनाई करण्यात आली आहे. शासकीय वाहने सोडून अन्य वाहनांना या परिसरात प्रवेश देण्यात येणार नाही, तसेच मतमोजणी केंद्रात अधिकृत परवानगी पत्र (पास) असलेल्या व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार आहे.

हेही वाचा – पुणे : मिळकतीची परस्पर विक्री करून १५ कोटींची फसवणूक, बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा

निकालानंतर विजयी मिरवणुकीस बंदी

मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विजयी उमेदवारांना विजय मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.