तळेगाव दाभाडेचे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सचिन शेळके यांच्यावर गुरुवारी अज्ञात व्यक्तींनी चाकूने हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेल्या शेळके यांना तळेगावमधील सेवाधाम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हल्ल्यानंतर संपूर्ण तळेगावामध्ये गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. हल्ल्याचा निषेध कऱण्यासाठी काहीवेळ तळेगावमध्ये शेळके यांच्या भावाच्या नेतृत्त्वाखाली रास्तारोको आंदोलनही करण्यात आले.