पुणे : मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये शाहू, फुले आणि डॉ. आंबेडकर यांचे विचार आणि प्रतिमा दिसत नाही. त्यामुळे जरांगे हे मनूवादी वृत्तीचे असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे, असा आरोप माजी आमदार लक्ष्मण माने यांनी बुधवारी केला. मराठा आरक्षणाला विरोध नाही. मात्र, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून ते देण्याच्या मागणीला विरोध आहे. ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण दिल्यास मागासवर्गीय जातींवर अन्याय होईल. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण न देता वेगळे आरक्षण द्यावे, असेही माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ते म्हणाले की, ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीला सर्वस्तरातून विरोध होत असतानाही जरांगे ओबीसीतून आरक्षण मिळावे, ही मागणी करीत आहे. त्यासाठी ते दबावतंत्र वापरत आहे. मात्र, देशाचा कारभार हा संविधानानुसार चालतो, त्यामुळे संविधान असेपर्यंत त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही. राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाचे वर्चस्व आहे. आतापर्यंत अनेक मराठा मुख्यमंत्री झाले आहेत. सर्वाधिक आमदार, खासदार मराठा समाजाचे आहे. सहकारी संस्था त्यांच्या हातामध्ये असून, सर्वच क्षेत्रांत त्यांचे वर्चस्व असतानाही त्यांना आरक्षणाची गरज का पडत आहे, याचा विचार मराठा समाजाने करावा, असे माने यांनी सांगितले.

हेही वाचा >>>पुण्यात पाच हजारपेक्षा जास्त शंभरीपार मतदार

अजित पवारांवर टीका

शरद पवार यांचे वय झाले असल्याने त्यांनी राजकारणातून निवृत्त व्हावे, असे अजित पवार म्हणत आहेत. मात्र, शरद पवार यांच्यावर टीका करण्याचा कोणताही अधिकार अजित पवार यांना नाही. शरद पवारांमुळे अजित पवार आहेत, याची जाणीव त्यांनी ठेवावी. सकाळी लवकर उठून काम करतो, असा दावा अजित पवार नेहमी करतात. मात्र, त्यांना सकाळी सहा वाजता शेतकरी भेटायला येत नाही तर सरकारी अधिकारी आणि कंत्राटदार भेटतात. ते श्रीमंत उमेदवारांना तिकीट देतात. अजित पवार श्रीमंताचे नेते आहेत, असा आरोप त्यांनी केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laxman mane criticism of manoj jarange patil patil pune print news apk 13 amy
First published on: 24-01-2024 at 23:55 IST