शिरूर : शिरूर तालुक्यातील जांबूत भागातील जोरी वस्ती येथे वनविभागाकडून लागण्यात आलेल्या पिंजऱ्यात अखेर बिबट्या जेरबंद झाला आहे. पकडलेली ही बिबट्याची मादी सात ते आठ वर्षे वयाची आहे. बिबट्याची रवानगी माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रात करण्यात येणार असल्याची माहिती शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी दिली. जांबूत भागांत गेल्या काही दिवसांत बिबट्याचा वावर वाढला असून, दहा दिवसांपूर्वी जोरी वस्ती येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाला होता.

जोरी वस्ती येथे राहणारी पूजा भगवान नरवडे (वय १९) ही १२ ऑक्टोबरला बिबट्याने केलेल्या हल्ल्लात ठार झाली होती. पूजा जोरी वस्तीवर आपल्या घरासमोरील ओट्यावर भांडी घासत असताना दबा धरून बसलेला बिबट्या तेथे आला. तिच्यावर झडप घातली. पूजाने आरडाओरड केल्याने तिची आई यमुना बाहेर आल्या आणि मदतीसाठी धावाधाव केली. काही ग्रामस्थ दांडके हातात घेऊन बिबट्याच्या मागे धावले. मात्र, बिबट्याने पूजाला फरपटत जवळच्या उसाच्या शेतात नेले. या हल्ल्यामध्ये पूजाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर या भागात वाढलेला बिबट्याचा वावर तसेच ग्रामस्थ आणि प्राण्यांवर होणाऱ्या हल्ल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.

demolishing building , citizens, Nandivali, dombivli, trouble of dust
Video : डोंबिवलीत नांदिवलीत रहिवासी, प्रवासी धुळीच्या लोटांनी हैराण; पुनर्विकासासाठी इमारत तोडताना नियम धाब्यावर
Five cases filed against extortionist Vaibhav Deore three crore extortion from BJP office-bearer
खंडणीखोर वैभव देवरेविरुध्द पाच गुन्हे दाखल, भाजप पदाधिकाऱ्याकडून तीन कोटी खंडणी
navi mumbai, Water Supply Worker, neglect, Leads to Flood Like Situation, main valve broke, water entered the chalwl, water supply workers slept, water waste, kopar khairane news, navi mumbai news, water news, marathi news, water leakage in kopar khairane,
नवी मुंबई : निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, कर्मचाऱ्यांची झोप नडली; रहिवाशांनी रात्र जागून काढली
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार

हेही वाचा : पुरानंतर दिवाळीनिमित्त राजकारण्यांचे मतदारप्रेम उफाळले

जांबूत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने बिबट्याला पकडण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या भागात १८ पिंजरे आणि २० कॅमेरे लावण्यात आले होते. वनखात्याची गस्तही वाढविण्यात आली होती. गेले दहा दिवस बिबट्या हुलकावणी देत होता. अखेर शनिवारी (२२ ऑक्टोबर) पहाटे जोरी वस्तीवर लावण्यात आलेल्या पिंजरात तो अडकला.