पुणे : सार्वजनिक आरोग्य विभागाने गर्भवती आणि दोन वर्षापर्यंतच्या बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी ‘वात्सल्य’ या नवीन उपक्रमाची सुरुवात केली आहे. गर्भवती, प्रसूतीपश्चात माता व २ वर्षापर्यंतची बालके यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांचे सक्षमीकरण करण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. याविषयीचा शासन निर्णयही काढण्यात आला आहे.

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना मेळघाट तसेच राज्यभरात दौरा करताना गर्भवतींची समस्या लक्षात आल्यानंतर यासंदर्भात योजना राबविण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार ‘वात्सल्य’ ही नवीन योजना राज्यभरात लागू करण्यात येत आहे. माता आणि बालमृत्यू कमी करण्यासाठी प्रसूती दरम्यान आणि प्रसूतीनंतर माता व बाल संगोपनाच्या विविध योजना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविल्या जात आहेत.

Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
students election duty marathi news
निवडणुकीच्या कामासाठी आता विद्यार्थ्यांचीही नियुक्ती
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Sangli
सांगली : तक्रार मागे घेण्यासाठी हॉस्पिटलकडे २५ लाखांच्या खंडणीची मागणी

हेही वाचा…राज्यात सर्वत्र हुडहुडी; पारा दहा अंशांच्या खाली; पुण्यात सर्वांत कमी तापमान

नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या ‘वात्सल्य’ या उपक्रमाअंतर्गत गर्भवती ते शिशू २ वर्षाचे होईपर्यंत आवश्यक सर्व गुणात्मक आरोग्य सेवांचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात तसेच शिशू २ वर्षाचे होईपर्यंत सर्व महत्त्वपूर्ण आरोग्य निर्देशांकावर सात्यत्यपूर्ण लक्ष ठेवून लाभार्थ्यांना आवश्यक आरोग्य सेवा देण्यात येतील. या उपक्रमामुळे कमी वजनाच्या बालकाच्या जन्माचे प्रमाण आणि जन्मजात व्यंग असलेल्या बालकांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. वात्सल्य उपक्रमात जननक्षम जोडपे व गर्भवती यांच्या आवश्यक चाचण्या करुन अतिजोखमीच्या मातांचे निदान होऊन त्यांच्यावर लवकर उपचार केले जातील. तसेच बालकांच्या एक हजार दिवसापर्यंत वाढीचे मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक सेवा दिल्या जातील.

वात्सल्य उपक्रमात काय होणार…

  • गर्भवतींची नियमित आरोग्य तपासणी
  • कुटुंबनियोजन साधन न वापरणाऱ्या जोडप्यांची तपासणी
  • जोडप्यांवर उपचार अन् त्यांचे समुपदेशन
  • प्रसूतिपूर्व, प्रसूतिपश्चात धोक्यांची तपासणी
  • माता, बालकाला आरोग्यासाठी असलेली जोखीम तपासणे
  • मातांची वजन वाढ, बालकांची योग्य वाढ यावर नियमित देखरेख