पुण्यातील कोथरूड परिसरातील गुजरात कॉलनीमधील एका इमारतीला सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागली. आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली, तरी ४६ दुचाक्या आणि तीन मोटारी जळून भस्मसात झाल्या आहेत. आगीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात दुचाक्या भस्मसात होण्याची शहरातील ही पहिलीच घटना आहे.
त्रिमूर्ती हाईट्स असे या इमारतीचे नाव आहे. इमारतीच्या बेसमेंटमध्ये केयूर इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान आहे. या दुकानाच्या गोडाऊनला रात्री एक वाजण्याच्या सुमारास आग लागी. ही आग वेगाने इतरत्र पसरली. अग्निशामक दलाच्या जवानांनी सर्वप्रथम इमारतीतील सुमारे ४५ नागरिकांना बाहेर काढले. एकूण पाच गाड्या आग विझवण्याचे काम करीत होत्या. पहाटे पाच वाजून ५० मिनिटांनी आग पूर्णपणे विझवण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले.
आगीमध्ये नेमके किती नुकसान झाले, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. संबंधित ठिकाणी पोलिस पंचनामा करण्यात येतो आहे. प्राथमिक माहितीनुसार शार्ट सर्किंटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Mar 2013 रोजी प्रकाशित
कोथरूडमध्ये इमारतीला भीषण आग; ४६ दुचाक्या, ३ मोटारी जळून खाक
पुण्यातील कोथरूड परिसरातील गुजरात कॉलनीमधील एका इमारतीला सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागली.

First published on: 26-03-2013 at 11:42 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Major fire in building at kothrud in pune