लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: मार्केट यार्ड परिसरात टेम्पोच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. वसंत रामचंद्र अवघडे (वय ४५) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी टेम्पो चालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

rod attack on st bus conductor marathi news
बारामतीमध्ये महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच आता नागपुरात एसटी वाहकावर रॉडने हल्ला…
Observation of flamingo deaths due to pollution and streetlights
नवी मुंबई : प्रदूषण, पथदिव्यांमुळे फ्लेमिंगो मृत झाल्याचे निरीक्षण
Pimpri, police died, police hit by vehicle,
पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू
Mumbai, One person beaten,
मुंबई : दुचाकी चोरत असल्याच्या संशयावरून मारहाणीत एकाचा मृत्यू, मालवणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल

याबाबत सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अवघडे मार्केट यार्डातील प्रवेशद्वार क्रमांक चार परिसरातून निघाले होते. त्या वेळी भरधाव टेम्पोने अवघडे यांना धडक दिली. अपघातानंतर टेम्पोचालक पसार झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या अवघडे यांच्यावर उपचार करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक शिंदे अधिक तपास करत आहेत.