दुसऱ्या पत्नीच्या सांगण्यावरून एकाने पत्नीच्या डोक्याच्या दगड मारून तिचा खून केल्याची घटना खडकवासला परिसरातील कुडजे गावात घडली. पत्नीचा खून केल्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुवर्णा सोमनाथ वाघ (वय ४२, रा. वारजे माळवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. सुवर्णाचा खून केल्यानंतर पती सखाराम वाघ (वय ५३, रा. आदित्य गार्डन सिटी, वारजे माळवाडी) याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

हेही वाचा >>> मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या आठपदरीकरणाचा खर्च ६०८० कोटींच्या घरात, निधी उभारणीचे एमएसआरडीसीसमोर आव्हान

याप्रकरणी सवत रंजना सोमनाथ वाघ आणि तिची मुलगी स्नेहल वाघ, तसेच सोमनाथ वाघ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुवर्णाची आई ताराबाई बाळासाहेब इलग (वय ६०, रा. प्रतापपूर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुवर्णाची सवत रंजना आणि तिची मुलगी स्नेहल सोमनाथकडे सुवर्णाची तक्रार करायची. दोघींच्या सांगण्यावरून तो सुवर्णाला शिवीगाळ करत होता. तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देऊन तो तिला मारहाण करत होता.

हेही वाचा >>> बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार दोन लाख मतांनी निवडून येतील – संजय काकडे

रंजना आणि स्नेहल सुवर्णाला टोमणे मारून हिणवत होते. तिचा शारीरिक आणि मानसिक छळ होत होता. रविवारी सकाळी सोमनाथने सुवर्णाला फिरायला जाण्याच्या बहाण्याने खडकवासला परिसरातील पिकॉक बे येथील कमळादेवी मंदिर परिसरात नेले. तेथील दाट झाडीत सुवर्णाला मारहाण करून तिच्या डोक्यात दगड घातला. त्यानंतर त्याने काही अंतरावर असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युसूफ शेख यांनी घटनास्थळी भेट दिली.